Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनावरील उपचारादरम्यान ‘या’ औषधाचा वापर नको, WHO चा डॉक्टरांना महत्वाचा सल्ला

WHO क्लिनिकल ट्रायल सोडून कोरोना उपचारासाठी आयव्हरमेक्टिन औषधाच्या वापराला परवानगी देत नाही, असं स्वामीनाथन यांनी म्हटलंय.

कोरोनावरील उपचारादरम्यान 'या' औषधाचा वापर नको, WHO चा डॉक्टरांना महत्वाचा सल्ला
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 6:39 PM

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने कोरोना रुग्णावरील उपचारादरम्यान आयव्हरमेक्टिन या औषधाचा वापर करु नका, असा सल्ला डॉक्टरांना दिला आहे. WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. ‘नव्या लक्षणांसाठी कोणत्याही प्रकारच्या औषधाचा वापर करण्यापूर्वी त्याची सुरक्षा आणि प्रभाव क्षमता तपासणं गरजेचं आहे. WHO क्लिनिकल ट्रायल सोडून कोरोना उपचारासाठी आयव्हरमेक्टिन औषधाच्या वापराला परवानगी देत नाही’, असं स्वामीनाथन यांनी म्हटलंय. (WHO scientists warn’s doctors over ivermectin medicine to treat corona patients)

डॉ. स्वामीनाथन यांनी जर्मनीतील दिग्गज हेल्थकेअर आणि लाईफ सायन्सेस कंपनी मर्क (Merck)चं एक जुनं वक्तव्य ट्विटरवर शेअर केलंय. फेब्रुवारी 2021 मध्ये जारी केलेल्या या वक्तव्यात म्हटलंय की, वैज्ञानिक कोरोनावरील उपचारासाठी आयव्हरमेक्टिनची सुरक्षा आणि प्रभाव क्षमता तपासण्यासाठी सर्व सध्यस्थितीतील आणि नव्या अभ्यासांचं परिक्षण करत आहे. आतापर्यंत कोरोनाविरोधात या औषधाच्या प्रभाव क्षमतेबाबत कोणतंही ठोस प्रमाण मिळालेलं नाही’.

गोवा सरकारकडून आयव्हरमेक्टिनच्या वापराला परवानगी!

मागील दोन महिन्यात दुसऱ्या वेळी WHO ने आयव्हरमेक्टिनच्या वापरावरुन इशारा दिला आहे. यापूर्वी मार्चमध्ये WHO ने सांगितलं होतं की, या औषधाच्या प्रवाभाबाबत खूप कमी प्रमाण मिळालं आहे. दरम्यान, डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी हे ट्वीट करण्याच्या एक दिवसापूर्वीच गोवा सरकारने कोरोनावरील उपचारासाठी 18 वर्षावरील रुग्णांवर उपचारासाठी आयव्हरमेक्टिनच्या वापसाचा सल्ला दिला आहे.

म्युकोरमायकोसिसचा महाराष्ट्रात पहिला बळी

म्युकोरमायकोसिस (mucormycosis) या आजाराने आता ग्रामीण भागातून शहरी भागात शिरकाव केला आहे. ठाणे आणि डोंबिवलीमध्ये म्युकोरमायकोसिसचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या डोंबिवलीतील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. राज्यात म्युकोरमायकोसिसमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.

मृत व्यक्तीचे नाव बाजीराव काटकर असून ते 69 वर्षांचे होते. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या सात रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे समजते. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात अधिकृतरित्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाजीराव काटकर यांचा मृत्यू झाल्याची बाब डॉक्टरांनी खासगीत मान्य केली आहे.

संबंधित बातम्या : 

केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

“रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?”

WHO scientists warn’s doctors over ivermectin medicine to treat corona patients

'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्रींकडून पाठराखण
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्रींकडून पाठराखण.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.