लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 1 लाख 65 हजार आरोग्य सेवकांना लस, मात्र टार्गेट अपूर्ण!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात 3 हजार 351 केंद्रांवर 1 लाख 65 हजार जणांना लस देण्यात आली.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 1 लाख 65 हजार आरोग्य सेवकांना लस, मात्र टार्गेट अपूर्ण!
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 7:54 AM

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. पहिल्याच दिवशी जवळपास 1 लाख 65 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात 3 हजार 351 केंद्रांवर 1 लाख 65 हजार जणांना लस देण्यात आली. शनिवारी संध्याकाळी आरोग्य मंत्रालयानं ही माहिती जारी केली आहे. लस दिल्यानंतर आतापर्यंत कुठलाही नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. तसंच कुणालाही अद्याप रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नसल्याचंही केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.(1 lakh 65 thousand health workers were vaccinated on the first day)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार लसीकरण मोहिमेत 2 प्रकारच्या लसीचा वापर केला जात आहे. त्यात सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीचा समावेश आहे. ही लस काल एकूण 12 राज्यांमध्ये देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत समावेश करण्यात आला नव्हता, त्यांची यादीही तयार करण्यात आली आहे. तसंच अजून काही लोकांना लसीकरणात सहभागी करुन घेण्यात आल्याचंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

लसीकरणाचं पहिल्या दिवसाचं टार्गेट पूर्ण नाही

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी टार्गेट पूर्ण करण्यात मात्र अपयश आलं आहे. पहिल्या दिवशी देशभरात किमान 3 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, पहिल्या दिवशी 1 लाख 65 हजार 714 जणांनाच ही लस दिली गेली आहे. लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या दिवशी 3 लाख जणांना लस देण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं.

पहिल्या दिवशी 3 हजार 351 केंद्रांवर लसीकरण

अंदमान निकोबार – 78 आंध्र प्रदेश – 16963 अरुणाचल प्रदेश – 743 आसाम – 2721 बिहार – 16401 छत्तीसगड – 4985 चंदीगड – 195 दादर – 64 दीव दमन 43- दिल्ली – 3403 गोवा – 373 गुजरात – 8557 पंजाब – 12100 राजस्थान – 9279 तामिळनाडू – 2728 तेलंगणा – 3600 उत्तर प्रदेश – 15975 उत्तराखंड – 2226 पश्चिम बंगाल – 9578 हरियाणा – 4656 हिमाचल प्रदेश -1408 जम्मू काश्मीर – 1954 झारखंड – 2897 कर्नाटक – 12637 केरळ – 7206 लक्ष्यद्विप – 21 मध्य प्रदेश – 6739 महाराष्ट्र – 15727 मणिपूर – 510 मेघालय – 509

तांत्रिक दोषामुळे कोरोना लसीकरण 2 दिवस बंद

लसीकरण मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने कोरोना लसीकरणाची मोहिम बंद झाली आहे. हा दोष दुरुस्त करण्यासाठी 17 आणि 18 जानेवारी असे 2 दिवस हे लसीकरण बंद राहणार आहे. केंद्र सरकारकडून ही समस्या दूर करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचण आली असता ऑफलाईन नोंदी करण्यास शासनाने परवानगी दिली होती. मात्र, यापुढील सर्व नोंदी ॲपद्वारेच करण्याचे निर्देश शासनाने दिलेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत 17 जानेवारी आणि 18 जानेवारी असे 2 दिवस कोविड 19 लसीकरण स्थगित ठेवण्यात आले. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Vaccination | आजचा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा, कोविड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांची प्रतिक्रिया

प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात, पण सामान्यांचा नंबर कधी?; राजेश टोपे म्हणाले…

1 lakh 65 thousand health workers were vaccinated on the first day

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.