कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस, स्तनपान करणाऱ्या महिलाही लस घेऊ शकतात, नव्या गाईडलाईन्स जारी
NEGVAC अर्थात (National Expert Group on Vaccine Administration for COVID-19)ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
मुंबई : कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या व्यक्तीने कोरोनाची लस कधी घ्यावी असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. त्यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलंय. कोरोनामुक्त झाल्यानंतर आता तुम्ही 3 महिन्यांनी लस टोचून घेऊ शकणार आहात. कारण NEGVAC अर्थात (National Expert Group on Vaccine Administration for COVID-19)ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. NEGVAC ने केलेल्या सूचनांमध्ये एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर त्याला 3 महिन्यांनी कोरोना लस द्यावी असं सांगण्यात आलं होतं. त्यांची ही सूचना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona free person should be vaccinated after three months)
NEGVAC ने केलेल्या सूचनानंतर एखादा व्यक्तीला कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर त्याने कोरोनामुक्त झाल्यानंतर 3 महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा. त्याचबरोबर आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोनाची लस दिली जावी असं NEGVAC ने म्हटलंय. तसंच कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांची एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
लसीकरणाबाबत NEGVACच्या 4 सूचनांना मंजुरी
1. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला 3 महिन्यानंतर कोरोना लस दिली जाऊ शकते
2. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांना दुसरा डोस घ्यावा.
3. आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या माताही कोरोना लस घेऊ शकतात.
4. कोरोना लस घेण्यापूर्वी रॅपिड एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नाही.
New Recommendations of National Expert Group on Vaccine Administration for COVID19 (NEGVAC) have been accepted & communicated to States/UTs. As per new recommendations, COVID19 vaccination to be deferred by 3 months after recovery from illness: Union Health Ministry pic.twitter.com/EIm9jPjpOB
— ANI (@ANI) May 19, 2021
NTAGI च्या सूचना केंद्राकडून अमान्य
दरम्यान, नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन (NTAGI)कडूनही काही दिवसांपूर्वी एक शिफारस करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड19 बाधित रुग्णांनी बरे झाल्यानंतर 6 महिन्यांनी कोरोना लस घ्यावी, अशी सूचना या तज्ज्ञांच्या गटाने केलीय. त्याचबरोबर गर्भवती महिलांना कोणतीही लस घेण्याचा पर्याय द्यायला हवा असंही सुचवण्यात आलंय. स्तनपान करणाऱ्या महिलांना प्रसुतीनंतर केव्हाही लस देता येईल, असंही सांगण्यात आलं होतं.
त्यानंतर NIAGI मंगळवारीही एक सूचना करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लस घेण्यासाठी 6 ते 9 महिन्याचं अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी NIAGI ने कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी 6 महिन्यानंतर कोरोनाची लस घ्यावी असं सांगण्यात आलं होतं. पण आता हे अंतर 9 महिन्यापर्यंत वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
लसीचं वावडे असलेलं गाव, अफवेमुळे कोणीही लस घेईना, पश्चिम महाराष्ट्रातील गावाचा ग्राऊंड रिपोर्टhttps://t.co/m58DKy9DZS#WestMaharashtra #Solapur #CoronaVaccine #Vaccination #DharsangVillage #CoronaPandemic
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2021
संबंधित बातम्या :
गावात 100 टक्के लसीकरण झाल्यास 10 लाख रुपये बक्षीस! कोणत्या राज्याचा निर्णय?
“भारतीयांच्या जीवाची किंमत मोजून कोरोना लस निर्यात केली नाही”, अखेर अदर पुनावालांनी मौन सोडलं
Corona free person should be vaccinated after three months