Corona Vaccine : 6 ते 12 वर्षाच्या मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय, कधीपासून घेता येणार Covaxinचा डोस?

Corona Vaccine for 6 to 12 years kids : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Corona Vaccine : 6 ते 12 वर्षाच्या मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय, कधीपासून घेता येणार Covaxinचा डोस?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 1:49 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona 4th Wave) संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी हाती आली आहे. आता वयवर्ष सहा ते बारा (Vaccine for children’s) या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सहा ते बारा वर्षांच्या मुलाला कोवॅक्सिन (Covaxin) लसीचा डोस देण्यात येईल. कोरोनाच्या लाटेत आतापर्यंत तरी लहान मुलांवर फारसा परिणाम जाणवला नव्हता. मात्र आता कोरोनाच्या नव्या एक्सई या वेरीएन्टमुळे अनेक चिमुरड्यांना संसर्ग होत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. तसंच कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर आता शाळाही सुरु झाल्या आहेत. मास्कचा वापरही तुलनेनं कमी झाल्याचं दिसून येतंय. अशातच शाळांचं नवं वर्ष सुरु झाल्यानंतर लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण अचानक वाठू नये, यासाठी वेळीच खबरदारी बाळगण्याची गरज आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं सांगितलं जातंय. तसंच गेल्या तीन आठवड्यात मुलांमध्ये तापाची लक्षणं वाढत असल्याचंही दिसून आलेलं आहे.

कोरोनाची लक्षण जर लाहन मुलांमध्ये आढळून आली, तर घाबरुन जाऊ नये, असं आवाहनही केलं जातंय. कोरोनाची सौम्य लक्षणं लहान मुलांमध्ये दिसत असून वेळेत उपचार केल्यास मुलं लगेचच बरीदेखील होत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र वेळीच लक्षणं ओळखण्याचं आव्हानंही पालकांसमोर असणार आहे. कोणत्याही प्रकारे सौम्य लक्षणांना दुर्लक्ष करुन चालणार नाही, असंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणंय.

लहान मुलांना कोणती लक्षणं?

  1. नाक वाहणं, सर्दी होणं
  2. घसा खवखवणं
  3. शरीर दुखणं
  4. सुका खोकला
  5. उलट्या होणं
  6. जुलाब होणं

काळजी काय घ्यायची?

लहान मुलांना कोरोनापासून दूर ठेवायचं असेल, तर साफसफाई ठेवणं गरजेचं आहे. तसंच नियमितपणे हात साबणानं आणि पाण्यानं धुणंही गरजेचंय. दरम्यान, लहान मुलांना बाहेर घेऊन जाणं शक्यतो टाळावं. तसंच रोगप्रतिक्राक शक्ती वाढावी, यासाठी आहारावर विशेष लक्ष द्यावं.

कधीपासून लस मिळणार?

वय वर्ष सहा ते बारा वयोगटातील मुलांवर कोरोनाचे उपचार करताना आतप्कालीन परिस्थितीत कोवॅक्सीन लस वापरता येईल, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, याआधीच बारा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात आलं होतं. मार्च महिन्यापासून लहान मुलांच्या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. आता सहा ते बारा वर्षांच्या मुलांनाही कोरोना लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.