राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोचली कोरोना लस, कोरोना योद्धांचेही मानले आभार

| Updated on: Mar 03, 2021 | 5:47 PM

राष्ट्रपती कोविंद यांनी आर्मी रिसर्च आणि रिफरल हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोचली कोरोना लस, कोरोना योद्धांचेही मानले आभार
Follow us on

नवी दिल्ली : पंतंप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राजकारणातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोरोना लस टोचली आहे. या यादीत आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही समावेश झाला आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी आर्मी रिसर्च आणि रिफरल हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. राष्ट्रपती कोविंद यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात परवानगी असलेल्या सर्वांनी कोरोना लस टोचून घेण्याचं आवाहन केलं आहे.(Corona vaccine was injected by President Ramnath Kovind)

राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कोविंद यांनी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीमेला यशस्वीपूर्वक पूर्ण करत असलेले सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांचे आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ज्यावेळी कोरोना लस घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्याही उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

60 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी पीडित असलेल्या 45 वर्षावरील व्यक्तींना लस टोचली जात आहे. या वयोमर्यादेत येणारे सर्व ज्येष्ठ नागरिक सरकारी दवाखान्यात जाऊन मोफत लस घेऊ शकतात. त्याचबरोबर ठराविक खासगी दवाखान्यातही कोरोनाची लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, खासगी दवाखान्यात तुम्हाल 250 रुपये मोजावे लागू शकतात.

मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस

कोरोना लसीकरणासाठी राज्य सरकारनेसुद्धा कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्याची परवानगी दिली आहे. नुकतंच केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबतचे निर्देश आहेत. यानुसार मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे.

मुंबईत ‘या’ रुग्णालयात मिळणार कोरोना लस

शुश्रुषा रुग्णालय, विक्रोळी
के. जे. सोमय्या रुग्णालय
डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय
वॉकहार्ट रुग्णालय
सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय
सैफी रुग्णालय
पी. डी. हिंदुजा रुग्णालय
डॉ. एल. एच. हिराचंदानी रुग्णालय
कौशल्य मेडिकल फाऊंडेशन
मसीना रुग्णालय
हॉली फॅमिली रुग्णालय
एस. एल. रहेजा रुग्णालय
लिलावती रुग्णालय
गुरु नानक रुग्णालय
बॉम्बे रुग्णालय
ब्रीच कँडी रुग्णालय
फोर्टिस, मुलुंड
द भाटिया जनरल रुग्णालय
ग्लोबल रुग्णालय
सर्वोदय रुग्णालय
जसलोक रुग्णालय
करुणा रुग्णालय
एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालय
SRCC चिल्ड्रन्स रुग्णालय
कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय
कॉनवेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन रुग्णालय
सुरुणा शेठिया रुग्णालय
हॉली स्पिरीट रुग्णालय
टाटा रुग्णालय

संबंधित बातम्या :

“फोटोसाठीच अट्टाहास माझा”, लसीकरण करताना मास्क काढल्याने काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

Photo : मोदी, पवारांसह ‘या’ दिग्गज नेत्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, पाहा फोटो

Mumbai COVID-19 Vaccination center | मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस मिळणार, पाहा यादी

Corona vaccine was injected by President Ramnath Kovind