Corona | 15 एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांना भारत बंदी, सर्व व्हिसा रद्द, भारताचा मोठा निर्णय
13 मार्चपर्यंत जारी करण्यात आलेल्या सर्व व्हिसा आणि ई-व्हिसाला रद्द करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना (Corona Virus Foreigners Visa Cancel) विषाणूपासून बचावासाठी भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने जगापासून अलिप्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने बुधवारी सर्व देशांचे व्हिसा रद्द केले आहेत. हे व्हिसा येत्या 15 एप्रिलपर्यंत रद्द असणार आहेत. म्हणजे जगातील कुणीही व्यक्ती आता कोरोनामुळे भारतात येऊ शकणार नाही. सामान्य (Corona Virus Foreigners Visa Cancel) परदेशीयांना भारतात येण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्या रात्री 12 पासून परदेशीयांवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
जर कुणी भारतीय व्यक्ती (Corona Virus Foreigners Visa Cancel) भारतात परत येऊ इच्छितो तर त्याला तपासणी करवून घ्यावी लागेल. त्यानंतर 14 दिवसांपर्यंत त्याला निरिक्षणाखाली राहावं लागेल.
“In the past two weeks, the number of cases of #COVID19 outside ?? has increased 13-fold & the number of affected countries has tripled.
There are now more than 118,000 cases in 114 countries, & 4,291 people have lost their lives”-@DrTedros #coronavirus
— World Health Organization (WHO) (@WHO) March 11, 2020
हेही वाचा : Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा
मात्र, राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकारी यांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे. जागतिक संघटनांच्या अधिकाऱ्यांना भारतात येता येणार आहे. शिवाय, व्हिसा फ्री देशांतली ये-जा सुद्धा 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
कोरोनासंबंधी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे
- 13 मार्चपर्यंत जारी करण्यात आलेल्या सर्व व्हिसा आणि ई-व्हिसाला रद्द करण्यात आलं आहे. हे व्हिसा 15 एप्रिलपर्यंच रद्द राहतील. पण, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, डिप्लोमॅट, रोजगार, प्रोजेक्ट व्हिसासह इतर शासकीय अधिकाऱ्यांना भारतात प्रवेश असेल.
- जे परदेशी नागरिक सध्या भारतात आहे, त्यांचा व्हिसा जारी राहील. जर त्यांना काउन्सलर अॅक्सेसची गरज असेल किंवा त्यांना त्याच्या व्हिसाची मुदत वाढवायची असेल तर ते FRRO ला संपर्क करु शकतात.
?नागपूर : OBC जातनिहाय जनगणना परिषद रद्द
?नागपूर : महापौर इनोव्हेशन अवॉर्ड कार्यक्रम पुढे ढकलला
?पुणे : कोरोनामुळे चीन, इराणकडून होणारी ड्रायफ्रूटस आयात बंद
?वाशिम : औद्योगिक प्रशिक्षण रोजगार मेळावा रद्द https://t.co/95hfoLJOVr
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 12, 2020
- OCI कार्ड होल्डर्सला जो मोफत व्हिसा ट्रॅव्हलचा फायदा मिळत होता. त्यालाही 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आलं आहे.
- जर कुठल्या परदेशी नागरिकाला भारतात यायचं (Corona Virus Foreigners Visa Cancel) असेल तर तो त्याच्या देशातील भारतीय दूतावासमध्ये संपर्क करु शकतो.
- चीन-इटली-इराण-कोरिया-स्पेन-जर्मनीसह इतर सर्व देशांची यात्रा करुन परतणाऱ्या भारतीयांची स्क्रिनिंग केली जाईल. यांना 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल.
- वैद्यकीय तपासणीनंतरच भू-सीमेपासून ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत प्रवेश मिळू शकेल.
- जर एखाद्या भारतीय नागरिकाला परदेश दौरा करायचा असेल, तर त्याने त्याचे नियोजन अशा पद्धतीने करावे जेणेकरुन त्यांना 14 दिवसापर्यंत निरीक्षणाखाली ठेवता येईल.
- भारत सरकार नागरिकांना आवाहन करते की, जर आवश्यक असेल तरच कुठल्या दुसऱ्या देशाची यात्रा करा.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना विषाणूची आतापर्यंत 60 प्रकरणं समोर आली आहेत. तर परदेशातून येणाऱ्या जवळपास 10 लाखापेक्षा जास्त जणांची तपासणी करण्यात आली आहे. परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या खूप जास्त. भारतात दररोज सरासरा 10 लाख परदेशी लोक येतात.
जगभरात कोरोनाची दहशत
जगभरात कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये जन्मलेला कोरोना विषाणू सध्या जगाच्या प्रत्येक बेटावर पोहोचला आहे. जगभरातील 107 देश कोरोनाच्या दहशतीत आहेत. तर एक लाखाहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 4600 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.
भारताप्रमाणेच अमेरिकेनेही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. अमेरिकेने युरोपीय देशांतून येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांवर अमेरिकेने बंदी घातली आहे.
11 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1,995 विमानांमधील 1,38,968 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सुचनेनुसार, सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या 3 विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून (Corona Virus Foreigners Visa Cancel) आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
‘समाजानं वाळीत टाकलं’, कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांची तक्रार
Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन ‘पॅनडेमिक’ कोणते?