नांदेडहून पंजाबला परतलेल्या आणखी 25 भाविकांना कोरोना, रुग्णसंख्या वाढण्याची भीती

महाराष्ट्रातील नांदेडमधून (Corona Virus In Punjab)  परतलेल्या भाविकांनी पंजाबमध्ये चिंता वाढवली आहे.

नांदेडहून पंजाबला परतलेल्या आणखी 25 भाविकांना कोरोना, रुग्णसंख्या वाढण्याची भीती
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 4:41 PM

चंदीगड :  महाराष्ट्रातील नांदेडमधून (Corona Virus In Punjab)  परतलेल्या भाविकांनी पंजाबमध्ये चिंता वाढवली आहे. बुधवारी पंजाबमध्ये 37 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 25 जण हे महाराष्ट्रातील नांदेडच्या श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून आलेले भाविक आहेत (Corona Virus In Punjab). नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या 36 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे.

त्याशिवाय, चार जण राजस्थानच्या कोटा येथून आलेले विद्यार्थी आहेत. आरोग्य विभागानुसार, नांदेड येथून आलेल्या या कोरोना पॉझिटिव्ह भाविकांमुळे पंजाबमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

भटिंडामध्ये बुधवारी सायंकाळी नांदेड येथून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यापूर्वी भटिंडामध्ये एकही कोरोना रुग्ण नव्हता. तर, तरनतारनमध्येही नांदेडहून परतलेले पाच जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Virus In Punjab) आसल्याचं समोर आलं आहे. इथेही यापूर्वी एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नव्हता. नांदेडवरुन आलेल्या लोकांमध्ये लुधियानाचे सात, मोहालीचे पाच फरीदकोटचे तीन, होशियारपूरचे तीन, भटिंडाचे दोन, पतियालाचे दोन, कपूरथलाचे दोन आणि संगरुरचा एका आहे.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर पंजाबच्या 20 जिल्ह्यांमधील 3,498 शिख भाविक हे महाराष्ट्रातील नांदेडमध्ये अडकून पडले. या भाविकांना बसेसच्या मदतीने पंजाबला परत आणले जात आहे. यापैकी, 2,293 भाविक हे पंजाब सरकारने पाठवलेल्या 64 बसेसमधून त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचले. पंजाब सरकारने नांदेडला 80 बसेस पाठवल्या होत्या. यापैकी 15 बसेस (Corona Virus In Punjab) अद्याप येणे बाकी आहे.

संबंधित बातम्या :

हे पहिल्यांदाच घडतंय : केरळमध्ये लॉकडाऊन पाळणाऱ्याला सोनं बक्षीस

अटी-शर्ती पाळून अडकलेल्या मजुरांना समन्वयाने राज्यात न्या, केंद्राचा निर्णय

पालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का? : खासदार हुसेन दलवाई

Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.