CoronaVirus : रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा, भारतात उपचारानंतर 11 जण ठणठणीत बरे

भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 82 वर पोहचली आहे (Corona patient recover after treatment). त्यापैकी 11 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून ते आता ठणठणीत बरे आहेत.

CoronaVirus : रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा, भारतात उपचारानंतर 11 जण ठणठणीत बरे
कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर तुम्ही या रोगाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करु शकता.
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 10:43 AM

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 82 वर पोहचली आहे (Corona patient recover after treatment). त्यापैकी 11 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून ते आता ठणठणीत बरे आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली.

आतापर्यंत देशात 82 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यापैकी 11 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत. यात केरळमध्ये 3 रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. सर्वाधिक बरे झालेले रुग्णांची नोंद दिल्लीत झाली आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या व्यतिरिक्त तेलंगानामध्ये देखील एक कोरोना व्हायरसने (COVID-19)  संसर्गित रुग्ण उपचार घेऊन बरा झाला आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचा संसर्ग जालेल्या प्रकरणांमध्ये 65 भारतीय, 16 इटालीयन आणि एक कॅनाडन नागरिकाचा समावेश आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचाही शोध घेऊन त्यांच्याही चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत या प्रक्रियेत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 4,000 हून अधिक लोकांची ओळख पटली आहे. या सर्वांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

लव अग्रवाल म्हणाले, “प्रमुख आणि छोट्या बंदरांवर एकूण 25,504 प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लँडपोर्टवर 14 लाखाहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली.” भारत सरकारने सामुहिक देखरेखीअंतर्गत कमीत कमी 42,296 प्रवाशांची तपासणी केली आहे. यात 2,559 लोकांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणं दिसली आणि 522 लोकांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. यात 17 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.”

या व्यतिरिक्त देशातील 30 विमानतळांवर एकूण 10,876 उड्डानांमध्ये 11 लाख 71 हजार 061 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. 3,062 प्रवाशांसह 583 संपर्कात आलेल्या लोकांचीही ओळख निश्चित करुन त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग झालेल्या चीन, इरान आणि जपानसारख्या देशांमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून इराणमधून 1,199 जणांचे नमूने कोरोना चाचणीसाठी भारतात आणण्यात आले आहेत, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

आरोग्य मंत्रालयाने 4 डॉक्टरांचं एक भारतीय पथकं रोममध्ये पाठवलं आहे. त्यांना तेथील भारतीयांचे चाचणीसाठी नमुने गोळा करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानंतर तेथील भारतीयांना परत आणले जाणार आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण

  • पुणे – 10
  • नागपूर – 3
  • मुंबई – 3
  • ठाणे – 1
  • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  1. पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  2. दाम्पत्याची मुलगी – 10 मार्च
  3. नातेवाईक – 10 मार्च
  4. टॅक्सी चालक – 10 मार्च
  5. मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  6. नागपुरात 1 – 12 मार्च
  7. पुण्यात आणखी एक – 12 मार्च
  8. पुण्यात 3 – 12 मार्च
  9. ठाण्यात एक – 12 मार्च
  10. मुंबईत एक – 12 मार्च
  11. नागपुरात 2 – 13 मार्च
  12. पुण्यात 1 – 13 मार्च
  13. अहमदनगर 1 – 13 मार्च

संबंधित बातम्या  

पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन ‘पॅनडेमिक’ कोणते?

Corona patient recover after treatment

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.