Asaram Bapu: आसाराम बापूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी एम्स रुग्णालयात हलवण्याची शक्यता

आसारामच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती नाजूक आहे. | Asaram Bapu Coronavirus

Asaram Bapu: आसाराम बापूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी एम्स रुग्णालयात हलवण्याची शक्यता
आसाराम बापू
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 1:14 PM

जयपूर: लैंगिक अत्याचारप्रकरणात कारावासाची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला (Asaram Bapu )कोरोनाची लागण झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. काही तासांपूर्वीच आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Controversial self styled godman Asaram Bapu tests Covid 19 positive hospitalised in ICU)

मात्र, त्यानंतरही आसारामची प्रकृती वेगाने खालावत आहे. आसारामच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे आता आसाराम बापूला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. 5 मे रोजी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती बिघडत गेली.

जोधपूर कारागृहात कोरोनाचा विस्फोट

जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गेल्या महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता. या ठिकाणी जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना तुरुंगातील दवाखान्यात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. (Asaram Bapu Covid Positive admitted in hospital)

यापूर्वीही छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

यापूर्वी 18 फेब्रुवारीला छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणी केल्यानंतर काहीही गंभीर आढळले नाही. त्यामुळे दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. या घटनेवेळी आसाराम बापूचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जेलच्या बाहेर जमले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

राजस्थानातील कोरोना स्थिती काय?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राजस्थानलाही कोरोनाचा विळखा घातला आहे. राजस्थानमध्ये काल दिवसभरात 16 हजार 815 नवीन कोरोनाबाधित आढळले. ही मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात आढळलेली सर्वात कमी आकडेवारी आहे. तर दुसरीकडे काल दिवसभरात सर्वाधिक 17,022 रुग्ण बरे झाले आहेत. वैद्यकीय विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. तर कोरोना मृत्यूची संख्या चिंताजनक बनली आहे. बुधवारी राज्यात 155 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात एकूण मृत्यूची संख्या 5021 झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Steroids मुळे कोरोना रुग्णांना गंभीर आजाराची भीती, डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

Corona Virus Fact Check | प्राण्यांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो ?, केंद्र सरकारच्या ‘या’ माहितीनंतर सत्य आलं समोर, वाचा सविस्तर

(Controversial self styled godman Asaram Bapu tests Covid 19 positive hospitalised in ICU)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.