नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये मंगळवारी 24 तासामध्ये कोरोनाचे 1500 हून अधिक नवीन रुग्ण आढळले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दिल्ली सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनच्या अहवालानुसार, दिल्लीत कोरोनाचे 1 हजार 537 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर यावेळी 5 जणांचा मृत्यूही झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्ह रेटमध्ये घट झाल्याचे आरोग्य अहवालात म्हटले आहे. तर मंगळवारी, कोरोनाचा दर 26.54 टक्के होता. याआधी म्हणजेच सोमवारी दिल्लीत कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट 33 टक्क्यांवर पोहोचला होता.
दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 714 आहे दिल्ली सरकारच्या आरोग्य अहवालानुसार मंगळवारी कोरोनामुळे 5 मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी 2 रुग्णांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण हे कोरोना आहे.
तर राहिलेल्या 3 जणांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कोरोना नसल्याचे सांगितले आहे. मागील 24 तासांत 794 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिल्ली सरकारने आपल्या कोविडच्या अहवालामध्ये सांगितले आहे की, गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाच्या 3 हजार 996 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी 1 हजार 795 लोकांची रॅपिड अँटीजेन चाचणीही करण्यात आली आहे.
सध्या दिल्लीतील रुग्णालयात 360 कोरोना रुग्ण दाखल असून आयसीयूमध्ये 123 रुग्ण दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे. 121 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांपैकी 289 दिल्लीचे नागरिक आहेत. 61 रुग्ण हे दिल्लीबाहेरचे आहेत.
दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याबरोबर आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी लोकांना गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.