सावधान! भारतात कोरोना वाढतोय, 1007 नव्या रुग्णांची वाढ

देशात मागील 24 तासांत कोरोनाबाधीतांचे नवे 1007 कोरोना रूग्ण वाढल्याने पॉझिटीव्ह रेट वाढला आहे.

सावधान! भारतात कोरोना वाढतोय, 1007 नव्या रुग्णांची वाढ
कोरोनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 11:37 AM

नवी दिल्ली : मागिल काही दिवसांपासून दिलासा देणाऱ्या कोरोनाने (Corona) आपले पाय पुन्हा पसरवायाला सुरूवात केली आहे. त्यामुळे देशातील आरोग्य मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) पुन्हा सतर्क झाला असून आरोग्य मंत्रालयाने सावधानतेचा इशारा दिला आहे. देशाची पुन्हा एकदा कोरोना महामारीकडे वाटचाल होत असून यामुळे तणाव वाढत आहे. भारतात 24 तासांत कोरोनाचे 1 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1007 रुग्ण आढळले आहेत. नवीन बाधीत वाढल्यानंतर देशातील कोरोना पॉझिटिव्ह दर 0.23च्या वर गेला आहे. त्याचवेळी, कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,058 वर पोहोचली आहे. मृत्यूच्या आकड्यांबद्दल बोलायचे झाले तर, 24 तासांत कोरोनामुळे 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यांनंतर, भारतातील (India) मृतांची एकूण संख्या 5,21,736 वर गेली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ८१८ रुग्ण कोरोनाचे बरे झाले आहेत. एक दिवस आधी बुधवारी (13 एप्रिल) देशभरात कोरोनाचे 1,088 नवीन रुग्ण आढळले होते. हा आकडा 12 एप्रिलच्या तुलनेत 36.6 टक्क्यांनी जास्त होता. यापूर्वी मंगळवारी 796 बाधीत आढळले होते. बुधवारी 24 तासांत नोंद झालेल्या मृत्यूंची संख्याही वाढली होती. बुधवारी हाच पॉझिटिव्ह रेट 0.25% होता. तर साप्ताहिक पॉझिटिव्ह रेट हा 0.24% होता.

एनसीआरमध्ये कोरोनाच्या विळख्यात मुलं

दिल्लीसोबतच एनसीआरमध्येही कोरोनाचा आलेख चढता आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नोएडा, गाझियाबादमधील बहुतेक मुले कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. गेल्या 24 तासात गौतम बुद्ध नगरमध्ये 15 विद्यार्थ्यांसह 44 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर गौतम बुद्ध नगरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 98787 वर पोहोचली आहे. या दरम्यान 490 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

24 तासांत 15 लाख लोकांना लसीकरण

देशात लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 15,05,332 लसीकरण करण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 1,86,07,06,499 लसीकरण करण्यात आले आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासात 4,29,323 कोविड चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत देशभरात 79.49 कोटी चाचण्या झाल्या आहेत.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात बुधवारी 124 नवीन पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली होती. तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे असे आरोग्य विभागाने सांगितले होते. राज्यात बुधवारी वाढलेल्या 124 नवीन पॉझिटिव्ह प्रकरणांमुळे राज्यातील बाधीतांची संख्या 78,75,448 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत 113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 77,26,903 झाली आहे. तर बरे होण्याचा दर 98.11 टक्के असून मृत्यू दर 1.87 टक्के आहे.

मुंबई

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत देखील कोरोना बाधीतांचा आकडा वाढताना दिसत असून येथे नव्या 73 रूग्णांची भर पडली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.