AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाणून घ्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू का झालाय आऊट ऑफ कंट्रोल?

कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्यता आहे. | Coronavirus mutation

जाणून घ्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू का झालाय आऊट ऑफ कंट्रोल?
| Updated on: Dec 21, 2020 | 10:16 PM
Share

नवी दिल्ली: ब्रिटनसह युरोपच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नव्या प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे. (Coronavirus B.1.1.7 Mutation in Britain)

कोरोना व्हायरसमधील हे म्युटेशन सामान्य आहे का?

लीसेस्टर विद्यापीठातील वैद्यकीय संसर्गतज्ज्ञ डॉ. ज्युलियन टँग यांच्या माहितीनुसार, विषाणूत अशाप्रकारचा बदल (म्युटेशन) सामान्य बाब आहे. इन्फ्लूएंझाप्रमाणे विविध विषाणू एकाच व्यक्तीला संक्रमित करू शकतात. यामधून हायब्रिड व्हायरसची निर्मिती होऊ शकते. तर लीव्हरपूल विद्यापीठातील प्राध्यापक ज्युलियन हिसकॉक्स यांच्या मतानुसार कोरोनाच्या विषाणूमध्ये सतत बदल घडत असतात. त्यामुळे SARS-CoV-2 चे नवे प्रकार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानव आणि प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या विषाणुंबाबत ही परिस्थिती नेहमी पाहायला मिळते.

B.1.1.7 महत्त्वाचा का?

चीनच्या वुहानमध्ये पहिल्यांदा SARS-CoV-2 मध्ये बदल पाहायला मिळाले होते. मात्र, या बदलांचे स्वरुप लक्षणीय नव्हते. याउलट ब्रिटनमध्ये आढळलेल्या B.1.1.7 ची जेनेटिक लक्षणे पाहता कोरोनाच्या मूळ विषाणुमध्ये मोठे बदल झालेले दिसत आहेत. विशेषत: कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये लक्षणीय बदल दिसत आहेत.

त्यामुळे सध्याची उपचारपद्धती फोल ठरण्याची शक्यता आहे. सध्या युरोपच्या अनेक भागांमध्ये नव्या कोरोना विषाणूची लक्षणे असलेले रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये तातडीने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाचा नवा विषाणू आणखी घातक आहे का?

ब्रिटनमधील काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या अंदाजनुसार कोरोनाचा नवा विषाणू अधिक वेगाने पसरणारा असू शकतो. मात्र, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा नव्या कोरोना विषाणुचा 40 ते 70 टक्क्यांनी जलद प्रसार होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या सध्याच्या लशींची परिणामकारकता कमी होण्याचा धोका आहे.

भारतासाठी हा कोरोना स्ट्रेन डोकेदुखी ठरणार?

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळं भारताची चिंता वाढली आहे. यामुळंच ब्रिटनहुन येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. ICMRच्या संचालकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नव्या कोरोना स्ट्रेनचा संसर्ग पसरण्याचा दर कोरोनाहून कित्येक पटीनं अधिक आहे. त्यामुळं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्लडमध्ये सध्या कडक पद्धतीनं कोरोना नियम राबवले जात आहेत.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

नव्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मुंबई सज्ज, लंडन रिटर्नवाल्यांची बडदास्त, स्पेशल रिपोर्ट

एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार, BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये

(Coronavirus B.1.1.7 Mutation in Britain)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.