Coronavirus:उत्तर प्रदेशात कोरोनाचं तांडव; स्मशाभूमीतील जागा संपली; ऑक्सिजन नसल्याने बरं होण्यापूर्वीच रुग्णांना डिस्चार्ज
आग्रा शहरातील स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठीही तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. | Coronavirus situation

लखनऊ: कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचलेल्या उत्तर प्रदेशात सध्या अक्षरश: विध्वसंक परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार (Cremation on Corona patients) करण्यासाठी स्मशानात जागाही शिल्लक राहिलेली नाही. मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी तीन-तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे आता आग्रा शहरातील लोकांवर आपल्या नातेवाईकांचे पार्थिव अलिगढमध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढावली आहे. (Coronavirus situation worsened in UP)
आग्रा शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्यापूर्वीच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. शनिवारी जवळपास 10 रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 1000 रुग्णांना डिस्चार्ज दिला. यापैकी प्रेमपाल सिंह यांचे निधन झाले. त्यानंतर मुलाने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. तेव्हा आग्रा शहरातील स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठीही तीन दिवस वाट पाहावी लागत असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे प्रेमपाल सिंह यांचा मुलगा कृष्ण कुमार लोधी यांनी अलीगढमध्ये जाऊन वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
अशीच वेळ मोहित कुमार यांच्यावरही आली. मोहित कुमार यांचे वडील अवधेश कुमार यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. आग्रा येथील ताजगंज स्मशानात त्यांनी अंत्यसंस्कारासाठी नोंदणी केली होती. मात्र, रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे अखेर मोहित कुमार यांनी आपल्या वडिलांचा मृतदेह कारच्या टपावरती बांधून स्मशानभूमीपर्यंत नेला.
आग्रा शहरात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा
राज्य सरकारने आग्रा शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 34 केंद्रे स्थापन केली आहेत. शनिवारी या रुग्णालयांमध्ये एकूण 3,340 रुग्ण होते. मात्र, या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक रुग्णालये आणि डॉक्टर्स स्वत: प्रयत्न करुन ऑक्सिजनचे सिलेंडर्स मिळवत आहेत. मात्र, तरीही ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने जवळपास 10 रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना बरे होण्यापूर्वीच डिस्चार्ज दिला होता.
गेल्या 24 तासांत देशात 3,52,991 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासांमध्ये भारतात 3,52,991 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2812 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय, गेल्या 24 तासांत देशातील 2,19,272 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.
संबंधित बातम्या :
Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर
मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलंय; निर्मला सीतारामन यांच्या पतीची चपराक
(Coronavirus situation worsened in UP)