Covid 19: भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार का, तीव्रता किती असणार?
कोणत्याही साथीचा प्रकोप नेमकी कधी वाढेल, हे निश्चित नसते. त्यामुळे रोगाची एखादी साथ अचानक निघूनही जाते. | Coronavirus
नवी दिल्ली: भारतात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही नव्या कोरोना (Coronavirus) रुग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे भारतात दुसऱ्या लाटेचा पीक पॉईंट येऊन गेला किंवा नाही, यावरुन बरीच मतमतांतरे आहेत. अशातच आता देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, याचे अंदाज बांधण्याचे काम सुरु आहे. (Covdi 19 third wave chances in India)
एखाद्या साथीच्या रोगाची तीव्रता मोजण्यासाठी लाट, पीक पॉईंट अशा संज्ञांचा वापर केला जातो. एका विशिष्ट कालावधीत रुग्णांची संख्या अचानक वाढली तर तो पीक पॉईंट समजला जातो. हा टप्पा पार केल्यानंतर रुग्णांची संख्या कमी होण्यास प्रारंभ होतो. सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक पॉईंट येऊन गेला आहे किंवा नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.
दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट
सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले जाते. एप्रिल महिन्यात या लाटेचा प्रारंभ झाला होता. त्यानंतर देशभरात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली. परिणामी आरोग्य सुविधा अपुऱ्या पडून अनेक रुग्णांवर जीव गमावण्याची पाळी आली. आता कोरोना रुग्णांची संख्या किंचीत कमी होताना दिसत आहे. मात्र, त्याचवेळी आता शास्त्रज्ञ भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा देत आहेत. मात्र, ही तिसरी लाट भारतात नेमकी कधी येणार, हे अद्याप निश्चितपणे कळालेले नाही.
तिसरी लाट येणारच का?
भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार किंवा नाही यावर डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांमध्येच बरेच मतभेद सुरु आहेत. कारण, कोणत्याही साथीचा प्रकोप नेमकी कधी वाढेल, हे निश्चित नसते. त्यामुळे रोगाची एखादी साथ अचानक निघूनही जाते. केवळ पीक पॉईंटच्या काळात रोगाच्या साथीचा प्रभाव प्रचंड असतो. भारतामधील विविध राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कमी-अधिक प्रभाव पाहायला मिळत आहे.
कोरोनाची तिसरी लाट कशी असेल?
अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल. साधारणत: कोणत्याही साथीच्या रोगाची दुसरी लाट ही पहिल्याच्या तुलनेत दुबळी असते. कारण तोपर्यंत लोकांमध्ये रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. मात्र, कोरोनाच्या विषाणुंमध्ये होणारे म्युटेशन पाहता असा ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लस हाच एकमेव उपाय मानला जात आहे.
संबंधित बातम्या:
Corona Cases in India | सलग तिसऱ्या दिवशी देशातील कोरोना रुग्ण वाढते, बळींचा आकडा 650 ने घटला
भारतात कोणत्या राज्यात कोरोना लाट कधी येणार? आयआयटी संशोधकांच्या अहवालात मोठे खुलासे
आता घरच्या घरी कोरोना चाचणी करणं शक्य, होम बेस्ड टेस्ट किटला मंजुरी, ICMRचा महत्त्वाचा निर्णय
(Covdi 19 third wave chances in India)