नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत दररोज 1500 हून कमी नवीन प्रकरणे समोर येत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत 1600 हून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले असल्याने लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी 24 तासात कोरोनाचे 1634 नवीन रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे आता दिल्लीत कोरोनाचा संसर्ग दर 30 टक्क्यांच्या जवळ पोहोचला असूनदिल्लीतही 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मात्र, दिल्लीच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या एका आरोग्य अहवालात 1 रुग्णाच्या मृत्यूचे कारण कोरोना असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसऱ्या रुग्णाच्या मृत्यूचे सुरुवातीचे कारण कोरोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर तिसऱ्या रुग्णाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.
सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 5 हजार 297 असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने जारी केलेल्या आरोग्य अहवालात गेल्या 24 तासांत दिल्लीत 5505 कोरोना चाचण्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या दरम्यान 270 कोरोना रुग्ण बरेही झाले आहेत. राज्यातील कोरोनाचा संसर्ग दर 29.68 वर गेला आहे.
दिल्लीत शनिवारी 1 हजार 396 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग दर 31.9 टक्के नोंदवला गेला आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 1 हजारच्या पुढे गेली होती. त्यानंतर दिल्लीत प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत असून दिल्लीबरोबरच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही प्रचंड वाढ होत आहे. तर देशातील इतर राज्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी महाराष्ट्रात 660 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला होता.