जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देश जेथील राजा स्वत:ला मानतो श्रीरामांचा वंशज, रामायण आहे राष्ट्रीय ग्रंथ तर तिथेही आहे एक अयोध्या

भारतच नाही तर जगाच्या पाठीवर आणखी असा एक देश आहे, की तेथील लोक रामाला आपलं अराध्य दैवत मानतात.

जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देश जेथील राजा स्वत:ला मानतो श्रीरामांचा वंशज, रामायण आहे राष्ट्रीय ग्रंथ तर तिथेही आहे एक अयोध्या
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 4:30 PM

उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.22 जानेवारी रोजी रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. भारतामध्ये श्रीरामांची मोठ्या भक्ती भावानं पूजा केली जाते. प्रार्थना केली जाते. दरवर्षी लाखो भाविक श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्याला जात असतात. मात्र भारतच नाही तर आशियामध्ये आणखी एक असा देश आहे, ज्या देशामध्ये बौद्ध लोकसंख्या बहुसंख्य आहे, मात्र तिथे श्रीरामांची पूजा केली जाते.

थायलंडमध्ये श्रीरामांची पूजा केली जाते, श्रीराम हे तेथील लोकांचं अराध्य दैवत आहे. ज्या प्रमाणे भारतामध्ये अयोध्या आहे.तसेच थायलंडमध्ये देखील अयुत्या नावाचं शहर आहे. हे शहर थायलंडची राजधानी बँकॉकच्या जवळच आहे.या शहरामध्ये विष्णू, ब्रम्हा महेश यांची देखील मंदिरं आहेत.येथील लोक मानतात की हे शहर म्हणजे प्रभू श्रीरामांची राजधानी आहे. थायलंडमध्ये हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही संस्कृतीचा विकास झाल्याचं पाहायला मिळतं.

थायलंड हे पूर्वी हिंदू राष्ट्र होतं. त्यामुळे येथील राजा आणि त्याच्या कुटुंबावर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव आहे. या देशाच्या राजाला येथील लोक भगवान विष्णूचा अवतार मानतात. थायलंडचा सध्याचा राजा देखील स्वत:ला रामाचे वंशज असल्याचं मानतो.एवढेच नाही तर राजा आपल्या नावाच्या आधी राम देखील लावतो.

राम दशम हे सध्या थायलंडचे राजे आहेत.राम दशम हे थायलंडमध्ये फुटबॉल प्रिन्स या नावाने देखील प्रसिद्ध आहेत.राम नवम यांच्या मृत्यूनंतर राम दशम यांना थायलंडचे राजे म्हणून घोषीत करण्यात आलं.वर्ष 2020 मध्ये या राजाची संपत्ती 43 अब्ज डॉलर इतकी होती.

रामायण आहे राष्ट्रीय ग्रंथ

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल येथील राष्ट्रीय ग्रंथ रामायण आहे, तेथे या ग्रंथाला राम कियेन असं म्हणतात, ज्याचा अर्थ रामाची किर्ती असा होतो. हा ग्रंथ वाल्मिकी रामायणावर आधारीत आहे. तसेच गरूड हे या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे. येथील हिंदू लोक मोठ्या भक्ति भावानं भगवान श्रीरामांची पूजा करतात.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.