Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाची पहिली वंदेभारत स्लिपर कोच एक्सप्रेस या मार्गावर धावणार ? पाहा काय आहे रेल्वे बोर्डाची योजना

वंदेभारत एक्सप्रेसना अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली आहे. या आधुनिक ट्रेनमुळे आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव मिळत आहे. सध्याच्या वंदेभारत चेअरकार स्वरुपाच्या असल्याने लांबच्या प्रवासासाठी स्लिपर कोचची सोय असलेल्या वंदेभारतची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. ही देशाची पहिली वंदेभारत एक्सप्रेस आर्थिक राजधानी मुंबईतून सुरु करण्याची रेल्वे बोर्डाची योजना आहे.

देशाची पहिली वंदेभारत स्लिपर कोच एक्सप्रेस या मार्गावर धावणार ? पाहा काय आहे रेल्वे बोर्डाची योजना
vande bharat sleeper coachImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 5:25 PM

मुंबई | 8 जानेवारी 2024 : आलिशान वंदेभारत एक्सप्रेसच्या प्रवासामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाबरोबर वेगवान प्रवासाचा अनुभव मिळत आहे. त्यामुळे या ट्रेन अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या असून त्यासाठी गर्दी होत आहे. सध्या देशात 34 हून अधिक वंदेभारत एक्सप्रेसचा प्रवास सुरु असून त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. वंदेभारत एक्सप्रेसचा वेग दर ताशी 160 कि.मी. हून अधिक आहे. सध्या सुरु असलेल्या वंदेभारत या केवळ चेअरकार स्वरुपाच्या असल्याने प्रवाशांना बसून प्रवास करावा लागतो. मात्र, आता झोपून लांबचा प्रवास करण्यासाठीची स्लिपर कोच वंदेभारत एक्सप्रेस केव्हा येणार याची प्रतिक्षा प्रवाशांना लागली आहे. आता लांबपल्ल्यासाठीची पहिली स्लिपर कोच वंदेभारत महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते राजस्थानच्या जयपूर शहरासाठी चालविण्याची शक्यता आहे.

वंदेभारत एक्सप्रेसच्या स्लिपर कोचची आवृत्ती रेल्वे बोर्ड येत्या नव्या वर्षांपासून सुरु करणार आहे. वंदेभारतच्या स्लिपर कोच आवृत्तीची निर्मिती चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात होत आहे. स्लिपर कोच आवृत्ती सुरु झाल्यास शयनयान श्रेणीमुळे लांबपल्ल्याचा प्रवास देखील आरामात झोपून करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. सध्या रेल्वे बोर्डा वंदेभारतच्या जोडीला सर्वसामान्यांसाठी वंदेभारतसारखीच सुविधा परंतू तिकीट दर कमी असलेल्या ‘अमृत भारत’ एक्सप्रेस देखील सुरु करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येहून अशा अशा सर्वसामान्य तिकीट दराच्या ‘अमृत भारत’ एक्सप्रेस सुरु केल्या आहेत.

नवी दिल्ली ते मुंबई मार्गाचीही चाचपणी

वंदेभारत ही आधुनिक तंत्रज्ञानाची ट्रेन असली तरी ती संपूर्ण देशी बनावटीची ट्रेन आहे. या ट्रेनची निर्मिती चेन्नईच्या आयसीएफ कोच फॅक्टरीत झाली आहे. वीजेवर धावणाऱ्या या ट्रेन वेगवान आणि इंजिनलेस असल्याने वेळेची बचत करणाऱ्या आहेत. या ट्रेनचा वेग सध्या दर ताशी 160 किमी असला तरी तो दर ताशी 180 ते 200 किमी पर्यंत वाढविता येऊ शकतो. त्यासाठी रेल्वे रुळ आणि सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरु आहे. मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या मार्गाचे देखील आधुनिकीकरणाचे वेगाने सुरु आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली मार्गाचाही वंदेभारत स्लिपर कोच सुरु करण्यासाठी होऊ शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.