Longed Covid : कोरोना झालेल्या लोकांना आता या 20 आजारांचा धोका..! सरकार चिंता व्यक्त करत आहे, काळजी घ्या
कोरोना होऊन गेल्यानंतर अनेकांना आता आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या जाणवू लागल्या आहेत, या त्रासालाच आता लाँग्ड कोविड असे संबोधले जात आहे.
मुंबईः कोरोना (Corona) होऊन गेल्यानंतर अनेकांना आता आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या जाणवू लागल्या आहेत, या त्रासालाच आता लाँग्ड कोविड (Longed Covid) असे संबोधले जात आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, कोरोना बरा झालेल्या रुग्णांना 1 वर्षाच्या आत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी 20 रोगांसह इतर काही गंभीर आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ते रोग कोणते आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. देशात आता पुन्हा एकदा कोविड 19 (Covid 19) चे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यामुळे केंद्र आणि राज्यातील आरोग्य विभागांनी चिंता व्यक्त केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात मागील 24 तासात 1 हजार 247 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनासाठी सरकारकडून जे नियम दिले गेले होते त्यांचे पालन करण्याच्या सूचना आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे नवे नवे व्हेरिएंट समोर येत आहेत, आणि त्या गोष्टी आता संशोधनानंतर सिद्धही केल्या गेल्या आहेत. कोरोनाचे जे संशोधन झाले आहे, त्यामध्ये असे स्पष्ट केले गेले आहे की, गेल्या वर्षाभरात ज्यांना ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांना घातक परिणामांचा सामना करावा लागणार आहे. त्यामध्ये काही गंभीर आजारांचाही समावेश आहे. त्यामध्ये डायबेटीज 2 याचाही समावेश आहे.
आरोग्याच्या गंभीर समस्या
कोरोना होऊन बरा झाल्यानंतरही काही लोकांना दीर्घकाळापर्यंत त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, त्यालाच longed Covid असे म्हटले जात आहे. काही काळाआधी ज्या लोकांना ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र एका अहवालानुसार असे स्पष्ट केले गेले आहे की, ज्या लोकांना गेल्या वर्षभरात कोविड झालेला होता, त्यांना पुढील बारा ते तेरा महिन्याच्या काळात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात असंही स्पष्ट केले गेले आहे. कोविड होऊनही जे रुग्ण घाबरुन रुग्णालयात दाखल होऊ शकले नाहीत, त्यांनाही मोठा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाची दीर्घकालीन लक्षणे
नेचर मेडिसिनने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, हृदय आणि रक्तवहिन्यासंबंधी कोरोनाची दीर्घकालीन लक्षणे दिसू लागली आहेत. यामध्ये ह्रदयविकाराचा झटका, हर्टब्रेक,, स्ट्रोक, रक्त गाठी धरणे, रक्तवाहिन्यांचे आजारांचा समावेश आहे. तसेच, कोविडमधून बरे झालेल्या लोकांमध्ये रक्त गोठण्याची समस्या दिसून येत आहे. त्याच्यावर वेळेवर उपचार केला नाही तर मृत्यू देखील होऊ शकतो.
वर्षभरानंतर हृदयविकाचा झटका
ज्या लोकांना कोरोना होऊन वर्ष झाले आहे, अशा 72 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना वर्षभरानंतर हृदयविकाचा झटका येण्याचा त्रास झाला आहे. हृदयरोगतज्ज्ञांच्या मते 1 कोटी 10 लाखांपेक्षा अधिक लोकांची आरोग्य तपासणी करुन ज्यावेळी अहवाल तयार करण्यात आला त्यावेळी त्यातील दीड लाखांपेक्षा अधिक हृदयविकाराचा झटका आला होता. आणि या सर्वांना कोविड होऊन गेलेला होता. ज्या लोकांची आरोग्य तपासणी करुन अहवाल देण्यात आला त्यांना 20 प्रकारचे हृदयरोग असल्याचे निदान केले गेले होते. हा अहवाल तयार करण्यात आल्यानंतर काहींनी असे सांगितले घाबरून काही जणांनी कोरोना लस घेतली नव्हती.
टाईप 2 डायबेटीज होण्याचीही शक्यता
संशोधनानुसार, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 12 महिन्यांत 46 टक्के लोकांना टाइप 2 डायबेटीज होण्याची शक्यता आहे. हे संशोधन अशा लोकांसाठी आहे ज्यांना सौम्य लक्षणे होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लस हा कोरोनाविरुद्धचा सर्वोत्तम मार्ग आहे. लस घेतल्याने धोका कमी होणार आहे.
संबंधित बातम्या
Hazara Community : पहिल्यांदा झेलल्या तालिबान्यांच्या यातना; आता होत आहेत हल्ले, कोण आहे हजारी समाज