Oxygen Tanker : ऑक्सिजनचं उत्पादन वाढवा, टँकर्स सुसाट सोडा, पंतप्रधान मोदींचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत (Oxygen Tanker) आढावा बैठक घेतली. त्यांनी सध्याच्या ऑक्सिजन साठा, निर्मिती आणि पुरवठ्याची माहिती घेतली.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave Of Covid-19) उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड (Hospital Beds) उपलब्ध नाही, महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनचा (oxygen) तुटवडा आहे. ही परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत (Oxygen Tanker) आढावा बैठक घेतली. त्यांनी सध्याच्या ऑक्सिजन साठा, निर्मिती आणि पुरवठ्याची माहिती घेतली. (COVID-19: PM Modi suggests increasing oxygen production as per capacity of each plant, say officials)
यावेळी बैठकीला आरोग्य मंत्रालय, स्टील मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयासह विविध विभागाचे मंत्री आणि अधिकारी सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयांना राज्य सरकारांसोबत योग्य प्रकारे समन्वय साधण्याचे निर्देश दिले.
पंतप्रधानांकडून आढावा
पंतप्रधानांना सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. राज्य आणि वाहतूकदारांना ऑक्सिजनची ने-आण करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असं आश्वासन दिल्याचं मोदींना सांगण्यात आलं. शिफ्टमध्ये ड्रायव्हर्सची ड्युटी लावून 24 तास टँकरसह सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर सिलेंडर भरले जाणाऱ्या प्लांटमध्ये 24 तास काम सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे.
मोदींनी आढावा बैठक घेतली
PM Modi took a comprehensive review to ensure adequate medical grade oxygen supply in the country. Inputs from ministries like Health, DPIIT, Steel, Road Transport were also shared with the PM. He stressed that it’s important to ensure synergy across ministries & state govts: PMO pic.twitter.com/zRNBlbyOm0
— ANI (@ANI) April 16, 2021
ऑक्सिजन टँकर्सना कोणतेही निर्बंध नाहीत
पंतप्रधानांनी कोरोनाने सर्वाधिक त्रस्त असलेल्या 12 राज्यांमध्ये पुढील 15 दिवस ऑक्सिजन पुरवठा कसा होईल याची माहिती घेतली. प्रत्येक ऑक्सिजन प्लांटची क्षमता वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या टँकर्सवर कोणतेही निर्बंध घालू नका, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
संबंधित बातम्या