Covishield लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता, नेमकं NTAGIने काय सुचवलं?
Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : लसीकरणाबाबत (Corona Vaccination) महत्त्वाची घडामोड समोर येते आहे. लवकरच कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतराबाबत महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला आहे. कोविशील्ड (Covishield) लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयनं हा सल्ला दिलाय. त्यामुळे आता कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सध्याच्या घडीला कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जातो. आता हे अंतर आणखी कमी केल्यास कोरोना लसीकरणालाही वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. एनटीएजीआयनं दिलेल्या सल्ल्याबाबत आता लवकरच अधिकृत निर्णयात बदललं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. बारा आठवड्यांवरुन आठ आठवड्यांवर दुसरा कोरोना लसीचा डोस आल्यास दोन महिन्यात कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस (Second dose of Covishield vaccine) घेता येणं शक्य होणार आहे.
एनटीएजीआय म्हणजे काय?
एनटीएजीआय म्हणजे नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रूप ऑन इम्युनिसेशन! यालाच मराठी लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण सल्ले देणारी एक संस्था म्हणूनही ओळखलं जात. देशातील लसीकरणाबाबत ही राष्ट्रीय दर्जावरील संस्था वेळोवेळी लसीकरणाबाबत आपला अभ्यास आणि निदर्शन विचारात घेऊन सल्ले देत असते.
कोविशील्डसाठी 4 आठवडे कमी होणार..
कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी आधी बारा आठवडे वाट पाहावी लागत होती. आता हे अंतर कमी होऊन, चार आठवड्यांचा अवधी घटवण्यात येण्याची शक्यता असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी म्हटलंय. आता आठ आठवड्यांनंतर कोविशील्ड लसीचा दुसरा डोस दिला जाऊ शकतो, असंही सांगितलं जातंय. दरम्यान, भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीबाबत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोवॅक्सीन लसीचा दुसरा डोस हा 28 दिवसांनंतर दिला जातो.
कोवॅक्सिन बद्दलच असा निर्णय का?
एन्टीबॉडी तयार होण्यासाठी लसीमधील अंतर हा महत्त्वाचा टप्पा असतो. या अंतरावरुनच लसींच्या दुसऱ्या डोसबाबतचा निर्णय घेतला जातो. आता कोविशील्डबाबत जो महत्त्वपूर्ण अभ्यास समोर आला आहे, त्यानुसार आठ ते 16 आणि 12 ते 16 या दोन्ही अंतरात कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लसीचा दुसरा डोस एकसारखाच परिणाम दाखवतो आहे. त्यामुळे लस लवकर घेतली, तरीही एन्टीबॉडी तयार होण्याचं प्रमाण जवळपास सारखंच असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे लवकरच हे अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं बोललं जातंय. आतापर्यंत देशातील सात कोटी जनतेने कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत.
गेल्या वर्षी अंतर वाढवलं!
13 मे 2021 रोजी एनटीएजीआयच्या शिफारशींनुसारच कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं. सहा ते आठ आठवड्यांच्या अंतरावरुन हे अंतर बारा ते सोळा आठवडे इतकं वाढवण्यात आलं होतं.
#JustIn: The NTAGI has recommended expansion of second dose of COVID-19 vaccine #COVISHIELD from 8 to 16 weeks after 1st dose in view of ongoing Omicron pandemic: Official Sources. Presently, the 2nd dose of #COVISHIELD is given 12-16 weeks after the first dose.
— Ayushman Kumar (@Iam_Ayushmann) March 20, 2022
आतापर्यंत किती जणांचं लसीकरण?
- 181.19 कोटी जणांचं लसीकरण झाल्याच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा
- शनिवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 13,63,853 जणांना लस
- 12-14 वयोगटातील 16,76,515 जणांचं आतापर्यंत लसीकरण
- कोविड फ्रंट लाईन वॉरीअर्स आणि ज्येष्ठांपैकी एकूण 2,17,30,449 यांना प्रीकॉशनरी डोस
संबंधित बातम्या :
प्रसूतीनंतरही रहा ‘फिट अँड फाइन’… असा ठेवा आहार, पोटाचे विकारही होतील दूर
लहान वयातच मुलांच्या दातांना कीड का लागते बरं? जाणून घ्या कारण आणि उपाय
तुम्ही कमी पाणी पिता का?, सावधान! तुम्हाला होऊ शकतात गंभीर आजार