Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लस घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 20 आजारांची यादी, 1 मार्चपासून याच आधारावर होणार लसीकरण

60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. (Second Phase Corona Vaccination)

कोरोना लस घेण्यापूर्वी जाणून घ्या 'या' 20 आजारांची यादी, 1 मार्चपासून याच आधारावर होणार लसीकरण
corona-vaccine
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 10:29 PM

नवी दिल्ली : येत्या 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या ( corona vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लस घेण्यासाठी 1 मार्चपासूनच सुरुवात होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने या टीकाकरणासाठी 20 गंभीर आजारांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार येत्या 1 मार्चपासून लसीकरण केले जाणार आहे. दरम्यान कोरोना लस ही शासकीय रूग्णालयात मोफत दिली जाणार आहे, तर खासगी रुग्णालयात लोकांना याची किंमत मोजावी लागेल. (Second Phase Corona Vaccination)

60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना वय निश्चित करण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे दाखवावे लागेल. तसेच ज्या नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरने दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. यात हृदयरोग, सीटी / एमआरआय-स्ट्रोक, 10 वर्षांपेक्षा जास्त काळ मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड रोग इत्यादी रोगांचा समावेश आहे.

20 गंभीर आजारांची यादी

1. गेल्या वर्षभरात हृदयविकाराचा झटकेमुळे रुग्णालयात दाखल झाला होतात का? 2. पोस्ट कार्डियक ट्रांसप्लांट किंवा लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्ट डिवाईस (LVAD) 3.सिग्निफिकेंट लेफ्ट वेंट्रिकुलर सिस्टोलिक डिसफंक्शन (एलवीईएफ 40 टक्क्यांहून कमी) 4. मॉडरेट किंवा गंभीर वल्वुलर हृदयविकार 5.पीएएच तसेच इडियोपॅथिक पीएएच सोबत कॉन्जेनाईटल हृदयविकार 6. यापूर्वी सीएबीजी तसेच पीटीसीए, एमआई आणि हायपरटेंशन किंवा डायबिटीजवर उपचार सुरु असतील. 7. एंजाइना, हायपरटेंशन या डायबिटीजचे उपचार सुरु असतील. 8. स्ट्रोक आणि हायपरटेंशन किंवा डायबिटीजवरील उपचार 9. पल्मोनरी अर्टरी हाइपरटेंशन आणि हाइपरटेंशन किंवा डायबिटीजवरील उपचार 10. डायबिटीज (10 वर्षाहून अधिक काळ)आणि हायपरटेंशनवरील उपचार 11-किडनी, लीवर किंवा हिमेटोपोएटिक स्टेम सेल ट्रांसप्लांट करणार असाल तर 12-किडनी रोगाचा शेवटचा टप्पा आणि हिमोडायलिसिस किंवा सीएपीडीवर उपचार सुरु असतील. 13-अनेक वर्षांपासून कोर्टिकोस्टेरॉयड्सच्या गोळ्यांचे सेवन करणे किंवा इम्युनिटी कमी होणाऱ्या गोळ्यांचे सेवन करणे 14-डिकंपेंसेटेड सिरोसिसचा आजार 15- गेल्या दोन वर्षांपासून श्वाससंबंधित गंभीर आजारावर रुग्णालयात उपचार सुरु असमे 16-लिफोमा, ल्यूकेमिया किंवा मायलोमा यासारख्या आजारांनी ग्रस्त असाल. 17- गेल्या 1 जुलै 2020 किंवा त्यानंतर कॅन्सरचे निदान झाले असले किंवा एखादी कॅन्सर थेरेपी सुरु असेल. 18-सिकल सेल बीमारी किंवा बोन मॅन्योर फेल्योर तसेच एप्लास्टिक एनीमिया किंवा थैलेसेमियाचा आजार 19-प्रायमरी इम्युनोडिफिशिएंसी किंवा एचआईवी इनफेक्शनचा आजार 20-इंटेलेक्चुअल डिसेबिलिटिज किंवा मस्कुलर डिस्ट्रोफी आणि असिड अटॅकसह श्वसन यंत्रणा प्रभावित होणे.  दिव्यांग, आंधळेपणा किंवा बहेरापण

कोणाला लस मिळणार, किती रुपये द्यावे लागणार

कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरणाचा दुसरा टप्पा राबवला जात आहे. या टप्प्यात 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येईल. तसेच 60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार या टप्प्यात 27 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाईल. जवळापास 12 हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी 250 रुपये द्यावे लागतील.

60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना वय निश्चित करण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे दाखवावे लागेल तर तर ज्या नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरने दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

‘हे’ कागदपत्रे लागतील

कोरोना लसीसाठी आधार नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इन्शूरन्स स्मार्ट कार्ड, मनरेगा ज़ब कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड, बँक/पोस्ट ऑफिस पासबुक, पासपोर्ट, पेन्शन डॉक्युमेंट, MP/MLA/MLA चं आयडी कार्ड, सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हिस आयडी कार्ड, नॅशनल पोप्युलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड यापैकी कोणतीही माहिती तुम्ही दाखवू शकता. (Second Phase Corona Vaccination)

संबंधित बातम्या : 

Fact Check : येत्या 1 मार्चपासून कोरोनाच्या लसीसाठी खरंच 500 रुपये मोजावे लागतील?

1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा, नोंदणी कशी करावी?, लस कोठे मिळणार?, अनेक अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.