कर्नाटकच्या ९ मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले, सर्व मंत्री आहेत करोडपती, सर्वात जास्त श्रीमंत…

१० पैकी ९ मंत्र्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकमधून सर्व मंत्रीहे करोडपती आहेत. मंत्र्यांची साधारण संपत्ती २२९ कोटी २७ लाख रुपये आहे.

कर्नाटकच्या ९ मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले, सर्व मंत्री आहेत करोडपती, सर्वात जास्त श्रीमंत...
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 11:26 PM

बेंगळुरू : असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफार्म्सनुसार, कर्नाटकात १० पैकी ९ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. कर्नाटकमध्ये नवीन सरकारची स्थापना झाली. शनिवारी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय ८ मंत्र्यांनी शपथ घेतली. कर्नाटक निवडणूक विभागाच्या रिपोर्टनुसार, ९ पैकी ८ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. शिवाय सर्व करोडपती आहेत.

ही रिपोर्ट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसह १० पैकी ९ मंत्र्यांच्या विश्लेषणावर आधारित आहेत. रिपोर्टमध्ये असं नमुद आहे की, १० पैकी एकाचा डाटा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती समोर आली नाही.

हे सुद्धा वाचा

सर्वसाधारण संपत्ती

असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने रिपोर्टमध्ये सांगितले की, १० पैकी ९ मंत्र्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकमधून सर्व मंत्रीहे करोडपती आहेत. मंत्र्यांची साधारण संपत्ती २२९ कोटी २७ लाख रुपये आहे.

डी. के. शिवकुमार सर्वात जास्त श्रीमंत

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सर्वात जास्त श्रीमंत आहेत. १ हजार ४१३ कोटी रुपये संपत्तीची त्यांनी घोषणा केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खडगे यांचा मुलगा प्रियांक खडसे यांची संपत्ती सर्वात कमी आहे. प्रियांक खडगे हे चित्तपूर विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत. त्यांची संपत्ती १६ कोटी ८३ लाख रुपये आहे.

मंत्र्यांचे शिक्षण

तीन मंत्र्यांनी आपली शैक्षणिक पात्रता ८ वी ते १२ वी पास घोषित केली. सहा मंत्र्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झाले असल्याचे घोषीत केले. पाच मंत्र्यांनी आपले वय ४१ ते ६० वर्षे सांगितले आहे. पाच मंत्री हे ६१ ते ८० वर्षे वयोगटातील आहेत. कर्नाटक मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आला नाही.  महाराष्ट्राप्रमाणे महिला मंत्र्यांची संख्या कर्नाटक मंत्रीमंडळात नाही. महिला सक्षमीकरणाचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.