Cyclone Asani Latest Updates : ‘असानी’ वादळ येत्या दोन दिवसात होऊ शकतं कमकुवत, ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आसनी चक्रीवादळ "मंगळवारपर्यंत ते वायव्येकडे सरकण्याची आणि उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीपासून पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.

Cyclone Asani Latest Updates : 'असानी' वादळ येत्या दोन दिवसात होऊ शकतं कमकुवत, ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी
असानी Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 1:59 PM

Cyclone Asani Latest Updates : बंगालच्या उपसागरावरील असानी चक्रीवादळ (Cyclone Asani) सोमवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दिशेने 25 किमी प्रतितास वेगाने सरकत आहे. परंतु पुढील दोन दिवसांत ते हळूहळू कमकुवत होण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘आसानी’मुळे ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागने सांगितले की, आज पहाटे 5.30 वाजता, चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून (Visakhapatnam) 550 किमी दक्षिण-पूर्व आणि पुरीच्या 680 किमी दक्षिण-दक्षिण-पूर्वकडे होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, असानी चक्रीवादळ “मंगळवारपर्यंत ते वायव्येकडे सरकण्याची आणि उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीपासून पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तर-ईशान्य दिशेला वळून ओडिशा किनार्‍याजवळ वायव्य बंगालच्या उपसागराकडे सरकू शकते. पुढील 48 तासांत ते हळूहळू कमकुवत होऊन चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी सांगितले की, ते ओडिशा किंवा आंध्र प्रदेशात पोहोचणार नाही. तसेच ते म्हणाले होते की, चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला समांतर सरकत जाईल. तर त्यामुळं मंगळवारी संध्याकाळपासून पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरात समुद्राची हालचाल तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना पुढील काही दिवस या क्षेत्रापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे, मंगळवारी संध्याकाळपासून ओडिशाच्या किनारी भागात आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तथापि, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), ओडिशा आपत्ती जलद प्रतिसाद दल (ODRAF) आणि अग्निशमन सेवांचे बचाव पथक कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. बालासोरमध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली असून ओडीआरएएफची एक टीम गंजम जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे. पुरी जिल्ह्यातील कृष्णा प्रसाद, सातपारा, पुरी आणि अस्तरंग ब्लॉक आणि केंद्रपारा मधील जगतसिंगपूर, महाकालपाडा आणि राजनगर आणि भद्रक येथेही ODRAF टीम तयार आहेत. सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

ओडिशाच्या या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

भुवनेश्वर हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उमाशंकर दास म्हणाले, चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मंगळवारी संध्याकाळपासून किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. मंगळवारी ओडिशातील गजपती, गंजम आणि पुरीच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी गंजम, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर आणि कटकमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच केंद्रपारा, भद्रक आणि बालासोरमध्येही गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे मंगळवार ते शुक्रवार पर्यंत पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पाडण्याची शक्यता आहे. तर कोलकात्याच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये एकाद दुसऱ्या ठिकानी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.