Cyclone Asani: आंध्र प्रदेशकडे सरकले वादळ, IMD चा रेड अलर्ट, परीक्षा 25 मे पर्यंत पुढे ढकलल्या, इंडिगोची उड्डाणे रद्द
या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या मध्यवर्ती शिक्षण मंडळाने आज 11 मे ते 25 मे या कालावधीत होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
नवी दिल्ली : असानी चक्रीवादळाचा (Asani Cyclone) तडाखा आता आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू राज्यांना बसताना पाहायला मिळत आहे. या राज्यात सकाळपासूनच जोरदार वारे वाहत आहेत. तसंच पावसालाही सुरुवात झाली आहे. असानी चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा सरकार (Odisha Government) हाय अलर्टवर आहेत. चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान असानी चक्रीवादळ आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. यादरम्यान हवामान खात्याने राज्याच्या किनारपट्टी भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. आसनी चक्रीवादळामुळे हवामान खराब झाले आहे. त्यामुळे इंडिगोच्या सर्व उड्डाणे (22 आगमन आणि 22 निर्गमन) आज रद्द करण्यात आली आहेत. तर आंध्र प्रदेशच्या मध्यवर्ती शिक्षण मंडळाने आज 11 मे ते 25 मे या कालावधीत होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्याचबरोबर तेलंगणाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. तसेच काकीनाडा जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला. तर आंध्र प्रदेशातील काकीनाडामध्ये समुद्राची स्थिती उग्र पहायला मिळत आहे. याचवेळी भारतीय हवामान खात्याने राज्याच्या किनारी भागासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे.
राज्यातील किनारपट्टी भागातील स्थानिक अधिकाऱ्यांना चक्रीवादळाशी संबंधित आपत्तींना तोंड देण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा विविध राज्यांतील तापमानावर परिणाम झाला आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद, विशाखापट्टणम, जयपूर आणि चेन्नईतील मुंबई येथून निघणारी 10 उड्डाणे चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आली. तर आसनी चक्रीवादळामुळे हवामान खराब झाले असून इंडिगोच्या सर्व उड्डाणे (22 आगमन आणि 22 निर्गमन) आज रद्द करण्यात आल्या आहेत.
Revised status of today’s flight ops in view of #CycloneAsani – All IndiGo flights (22 Arrivals plus 22 Departures ) stand cancelled. Air Asia cancelled one flight from Bengaluru & one from Delhi, decision about evening flights awaited: K Srinivasa Rao, Airport Dir, Visakhapatnam
— ANI (@ANI) May 11, 2022
या विमान कंपन्यांनीही केली उड्डाणे रद्द
विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक के. श्रीनिवास राव यांनी माहिती दिली की AirAsia ने बेंगळुरूहून एक आणि दिल्लीहून एक फ्लाइट रद्द केली आहे, संध्याकाळच्या फ्लाइटबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच श्रीनिवास राव यांनी माहिती दिली आहे की, स्पाईसजेटची कोलकाता-विशाखापट्टणम-कोलकाता उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. हैदराबाद उड्डाणाचा निर्णय दुपारी 2 नंतर घेतला जाईल.
हलक्या पावसाची शक्यता
तेलंगणाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. तर पुढील 24 तासांत हैदराबादमध्ये हलका पाऊस पडण्याची आणि पुढील 48 तास ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.
25 मे पर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या
या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या मध्यवर्ती शिक्षण मंडळाने आज 11 मे ते 25 मे या कालावधीत होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 12 मे पासून परीक्षेचे उर्वरित वेळापत्रक कायम राहणार आहे. परीक्षेचे ठिकाण आणि वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.