शाळा, कॉलेजसह पहिल्यांदाच हॉटेल बंद, चक्रीवादळाची ‘दाना’दाण, कोणत्या राज्याला धसका

अंदमान समुद्रात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. आज वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये हवामान प्रचंड खराब आहे.

शाळा, कॉलेजसह पहिल्यांदाच हॉटेल बंद, चक्रीवादळाची ‘दाना’दाण, कोणत्या राज्याला धसका
चक्रीवादळाची ‘दाना’दाणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 10:31 AM

Cyclone Dana Impact Latest Update : अंदमान समुद्रात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. आज वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये हवामान प्रचंड खराब आहे. सध्या चक्रीवादळाने अंदमानचा समुद्र सोडला असल्याने केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये वादळाचा परिणाम कमी झाला आहे. मात्र सध्या हे चक्रीवादळ बंगालच्या खाडीत आहे. उद्या, 24 ऑक्टोबर रोजी सकाळी हे वादळ ओडिशा मध्ये पुरीच्या समुद्रकिनारी धडकू शकतं.

दरम्यान आज वादळाच्या प्रभावामुळे ओडिशात ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. उद्या वादळ किनारपट्टीजवळ धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने रहिवासी आणि पर्यटकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. तसेच, स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरातच राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

ओडिशामध्ये वादळाचा सामना करण्यासाठी तयारी

ओडिशाचे विशेष मदत अधिकारी देव रंजन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा 25 ऑक्टोबरच्या सकाळी पुरीच्या किनारपट्टीवर धडकेल. त्यामुळे किनारी भाग रिकामा करण्यात आला आहे. 14 जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज, अंगणवाडी-कार्यालये बंद आहेत. मात्र कर्मचारी, डॉक्टर, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुरीहून पर्यटक बाहेर पडले आहेत, तेथील हॉटेल्सची बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. कार्तिक स्नानासाठी पुरीत पोहोचलेल्या 5 हजार महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

दरम्यान मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ओडिशा राज्य आपत्ती दलाच्या 51, अग्निशमन दलाच्या 178 आणि एनडीआरएफच्या 10 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. खराब हवामानामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आपला 3 दिवसांचा ओडिशा दौरा पुढे ढकलला आहे. मच्छीमारांना समुद्रकिनाऱ्यांजवळ न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. जवळपास 750 मदत केंद्रे स्थापन करण्यात आली असून नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असेल. भारतीय तटरक्षक दल (ICG), आर्मी, वायुसेना आणि नौदलाला अलर्ट मोडमध्ये ठेवण्यात आले आहे. हवाई दलाची विमाने आणि नौदलाची जहाजे जवळपास घिरट्या घालत राहतील असे समजते.

पश्चिम बंगालमध्येही खबरदारी

ओडिशासह पश्चिम बंगालमध्येही दाना चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल. त्यामुळे पश्चिम बंगालमधील 9 जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे पुढील 3-4 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच लोकांना घरून काम करण्याचा (work from home) सल्ला देण्यात आला आहे. मात्र डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी आणि जवानांची सुट्टी रद्द झाली आहे. दिघा, पूर्व मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातून 1.50 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

वादळाच्या प्रभावामुळे समुद्रात उंच लाटा उसळतील आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीचा भागही रिकामा करण्यात आला आहे. पुढील 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छिमार आणि खलाशांना हवामानाच्या सूचना आणि सुरक्षितता सल्ला देण्यासाठी हल्दियामध्ये हेलिकॉप्टर आणि रिमोट ऑपरेटिंग स्टेशन तैनात आहेत. एनडीआरएफच्या 9 तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.
तिकीटासाठी पक्षाशी बंड अन् एकाच घरात दोन पक्ष, वडील एका पक्षात तर...
तिकीटासाठी पक्षाशी बंड अन् एकाच घरात दोन पक्ष, वडील एका पक्षात तर....
5 कोटी जप्त, शहाजी बापूंवर आरोप मात्र कारचं कनेक्शन नेमकं कोणाशी?
5 कोटी जप्त, शहाजी बापूंवर आरोप मात्र कारचं कनेक्शन नेमकं कोणाशी?.
'लाडकी बहीण' विरोधात अनिल वडपल्लीवारांची याचिका, कोर्टाचे निर्देश काय?
'लाडकी बहीण' विरोधात अनिल वडपल्लीवारांची याचिका, कोर्टाचे निर्देश काय?.
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी.
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी.
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.