Dalai Lama birthday special: विश्व शांतीचे दूत, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा जन्मदिवस, वयाच्या तेविसाव्या वर्षी तिबेट सोडून भारतात शरण
6 जुलै रोजी दलाई लामा यांचा जन्मदिवस आहे. दलाई लामा ट्रस्टकडून जन्मदिनाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजतापासून सुरू होणार आहे. हा कार्यक्रम मुख्य बौद्ध मठ चुगलाखंग येथे होणार आहे. दोन तासांच्या या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विश्व शांतीचे दूत, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा आहेत. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा जन्म 6 जुलै 1935 ला झाला. दोन वर्षांचे असताना तेनजीस यांना दलाई लामा अशी मान्यता मिळाली. 15 वर्षांचे असताना त्यांनी राजनैतिक जबाबदारी स्वीकारली. वयाच्या 19 वीसाव्या वर्षी चिनी नेत्यांशी बोलणी करण्यासाठी ते बिजिंगला गेले. चीन तिबेटच्या बाबतीत सहकार्य करत नव्हता. अशावेळी दलाई लामांनी चिनी सरकारसोबत चर्चा केली. 21 व्या वर्षी दलाई लामा भारतात आले. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्याशी तिबेटच्या प्रश्नावर चर्चा केली. 23 व्या वर्षी त्यांनी तिबेट सोडण्याचा निर्णय घेतला. सैनिकाच्या वेशात ते भारतातील अरुणाचल प्रदेशात आले. भारतात येण्यासाठी त्यांना 14 दिवस लागले. वयाच्या तेविसाव्या वर्षी ते भारतात शरण आले. तिबेटी स्वातंत्र्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. गौतम बुद्ध (Gautam Buddha) आणि महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या विचारानं ते प्रेरित झालेत.
तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढा
दलाई लामा यांचा जन्मदिवस तिबेट समुदायात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. धर्मशाळा येथे जगभरातील लोकं या उत्साहात सहभागी होतात. 14 वे दलाई लामा तेनजीस ग्यात्सो यांचा जन्म उत्तर पूर्व तिबेटच्या ताकस्तेर क्षेत्रात झाला. दलाई लामा सहा दशकांपासून भारतात राहत आहेत. ते स्वतःला भारताचे पुत्र मानतात. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे तिबेटी समुदाय त्यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करतात. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी आपली जन्मभूमी सोडण्यास ते तयार आहेत. 64 वर्षांपासून तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. हिमाचल प्रदेशातील मकलोडगंजला त्यांनी आपली कर्मभूमी मानलंय. तिबेटवरील चीनच्या ताब्याविरोधात त्यांनी जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडली. जगभरात पसरलेल्या तिबेटीयन लोकांना त्यांनी एकत्र केले.
जन्म दिनी मकलोडगंडला येणार मुख्यमंत्री
मकलोडगंज हे ठिकाण छोटा ल्हासा म्हणून ओळखले जाते. त्याठिकाणी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या 87 व्या जन्मदिवसाची तयारी सुरू झाली आहे. 6 जुलै रोजी दलाई लामा यांचा जन्मदिवस आहे. दलाई लामा ट्रस्टकडून जन्मदिनाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजतापासून सुरू होणार आहे. हा कार्यक्रम मुख्य बौद्ध मठ चुगलाखंग येथे होणार आहे. दोन तासांच्या या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. निर्वासित तिबेटी सरकारचे पंतप्रधान पेंपा सेरिंगही या कार्यक्रमात उपस्थित राहतील. यानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गद्दी, नेपाली, लद्दाखी डान्स विद्यार्थी सादर करणार आहेत.