गायक दलेर मेहंदीला पंजाब कोर्टाचा दिलासा; 19 वर्षांपूर्वीचा खटला काय?
दलेर मेहंदी मानवी तस्करी प्रकरणी त्यांना न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन तीन वर्षांच्या कारावासाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
नवी दिल्लीः गायक दलेर मेहंदीला (Singer Daler Mehndi) मानवी तस्करी केल्या प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर आता मात्र न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याची शिक्षा रद्द करण्यात आली असून त्यांना आता त्यातून दिलासा मिळाल आहे. दलेर मेहंदी यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाव घेतली होती. त्यामुळे आता त्यांची शिक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
19 वर्षापूर्वी एका मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणात त्यांना पटियालाच्या ट्रायल कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आले होते, त्यामुळे त्यांना 3 वर्षांची शिक्षाही सुनावली गेली होती.
मानवी तस्करीचे प्रकरण
दलेर मेहंदी मानवी तस्करी प्रकरणी त्यांना न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन तीन वर्षांच्या कारावासाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना आता 19 वर्षांच्या मानवी तस्करी प्रकरणातून दिलासा देण्यात आला आहे.
नवज्योत सिद्धू बरोबच शिक्षा
दलेर मेहंदी यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत क्रिकेटर आणि राजकारणी नवज्योतसिंग सिद्धूलाही पटियाला तुरुंगात ठेवण्यात आले होते. तर आता न्यायालयाच्या आदेशानंतर दलेर मेहंदीची तुरुंगातून सुटका होणार आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ही पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात सुरू राहणार असल्याचेही त्यांच्या वकिलांनी सांगितले.
पंजाब सरकारला नोटीस
दलेर मेहंदी यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पंजाब सरकारला नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले होते.
त्यानंतर उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची सुनावणी आज झाली असून त्यावेळी त्यांना दलेर मेहंदींना न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे.
काय होतं प्रकरण
दलेर मेहंदी यांना ज्या प्रकरणात शिक्षा झाली आहे. ते प्रकरण मानवी तस्करीशी संबंधित असून 19 वर्षापूर्वीचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात दलेर मेहंदीसोबत त्यांचा भाऊ शमशेर सिंगही या प्रकरणात आरोपी होता, मात्र 2017 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये न्यायालयाने दलेर मेहंदीला या प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली होती.