‘दाना’ चक्रीवादळाचा धूमाकूळ, पण ओदिशात रिलीफ कँपमध्ये गुड न्यूज ! 1600 महिलांनी दिला मुलांना जन्म

बालासोर जिल्ह्यात सर्वाधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले, तिथे 1 लाख 72 हजार 16 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, त्यानंतर मयूरभंज येथे 1 लाख लोकांना हलवण्यात आले, असे ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी सांगितलं.

'दाना' चक्रीवादळाचा धूमाकूळ, पण ओदिशात रिलीफ कँपमध्ये गुड न्यूज ! 1600 महिलांनी दिला मुलांना जन्म
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 9:25 AM

सध्या ओडिशासह , पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये ‘दाना’ चक्रीवादळाने दाणादाण उडवली आहे. त्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या भागांत सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून अनके नागरिकांना स्थलांतरितही करण्यात आलं आहे. ओदिशातही चक्रीवादळाचा कहर दिसत असून याचदरम्यान लाखो लोकांचीही सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. याचदरम्यान ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी महत्वाची पण एक गुड न्यूज दिली आहे. दाना चक्रीवादळामुळे आरोग्य केंद्रात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांपैकी 1,600 महिलांनी मुलांना जन्म दिल्याचे त्यांनी नमूद केले.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 5,84,888 लोकांना धोक्याच्या भागातून हलवण्यात आले आहे. ही संख्या आणखी वाढू शकते. हलवण्यात आलेले हे नागरिक 6 हजारापेक्षा अधिक चक्रीवादळ निवारागृहात राहत आहेत, जिथे त्यांना अन्न, औषध, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बालासोर जिल्ह्यातून सर्वाधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले, तेथे 1 लाख 72 हजार 916 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तर मयूरभंज येथे 1 लाख लोकांना हलवण्यात आले. याशिवाय भद्रकमधून 75 हजार, जाजपूरमधून 58 हजार आणि केंद्रपारा येथून 46 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे. आम्ही हाय रिस्क असलेल्या भागातून सर्व लोकांना यशस्वीरित्या बाहेर काढले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारी विभागाची काय माहिती ?

मुख्यमंत्री मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना राज्यातील तयारीबद्दल माहिती दिली. ओडिशा सरकारने उचललेल्या पावलांवर केंद्राने समाधान दर्शवलं आहे. दरम्यान आदल्या दिवशी, कटक जिल्ह्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या एका महिलेने नियाली रुग्णालयात मुलाला जन्म दिला. राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क (I&PR) विभागाने याची घोषणा केली होती. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आश्रयस्थानात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांमध्ये त्या महिलेचा समावेश होता.

आई आणि नवजात बाळ हे दोघेही निरोगी असून त्यांची स्थिती उत्तम असल्याचे विभागाने सांगितले. चक्रीवादळ दाना साठी चालू असलेल्या तयारी दरम्यान, अधिकाऱ्यांनी नियाली रुग्णालयात त्या महिलेची सुरक्षित प्रसूती होईल याची काळजी घेतली. केली. ती व तिचे नवजात बाळ सुरक्षित असून सर्वांसाठी सुरक्षा आणि वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी आपत्ती प्रतिसाद पथके सज्ज आहेत असे समजते.

Non Stop LIVE Update
शिंदेंचे आमदार शहाजीबापूं पाटलांचं चॅलेंज, यंदा जिंकू किंवा मरू
शिंदेंचे आमदार शहाजीबापूं पाटलांचं चॅलेंज, यंदा जिंकू किंवा मरू.
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?.
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'.
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?.
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?.
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?.
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्.
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत.
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'.
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?.