अदार पुनावाला यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा

संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. पुनावाला यांची सुरक्षा वाढवण्याबाबत गृह मंत्रालयाने आज निर्णय घेतला. (Danger to Adar Punawala's life, ‘Y’ grade security provided by the Ministry of Home Affairs)

अदार पुनावाला यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा
अदार पुनावाला यांच्या जीवाला धोका?
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 8:37 PM

नवी दिल्ली : अवघे जग कोरोनाशी लढत असताना सध्या लसीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे. महाभयंकर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. याच अनुषंगाने लस उत्पादन करणारी सिरम इन्स्टिट्यूटला भारतासह संपूर्ण जगभर महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याच अनुषंगाने या कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांच्या जिवीताला धोकाही संभावत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. पुनावाला यांची सुरक्षा वाढवण्याबाबत गृह मंत्रालयाने आज निर्णय घेतला. (Danger to Adar Punawala’s life, ‘Y’ grade security provided by the Ministry of Home Affairs)

पुनावाला यांच्या संरक्षणार्थ असे असेल सुरक्षा कवच

अदार पुनावाला हे देशात कुठेही गेले तरी त्यांच्या संरक्षणार्थ ‘वाय’ दर्जाचे सुरक्षा कवच तैनात असणार आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलिस बल म्हणजेच सीआरपीएफवर सोपवण्यात आली आहे. पुनावाला यांच्यासोबत 24 तास 11 जवान तैनात राहणार आहेत. पुनावाला यांची वाढती लोकप्रियता तसेच कोरोना लढ्यात कोविशिल्ड लसीला जगभरातून मिळत असलेला वाढता प्रतिसाद याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. सिरम इन्स्टिट्यूटने अलिकडेच कोविशिल्ड लसीचे नवीन दर जाहीर केले. या दरवाढीवरून पुनावाला यांच्यावर काही प्रमाणात टीकाही झाली. हेही सुरक्षा वाढवण्यामागील एक कारण असू शकते, असे काही जाणकारांचे मत आहे.

राज्यांसाठी कोविशिल्ड लसीच्या दरात कपातीची पुनावालांची घोषणा

देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी आजपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीच्या किमती कमी कराव्यात, अशी विचारणा केंद्र सरकारनं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी 100 रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविशील्ड (Covishield Vaccine) लशीची किंमत निश्चित केली होती. एसआयआयने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली होती. (Danger to Adar Punawala’s life, ‘Y’ grade security provided by the Ministry of Home Affairs)

इतर बातम्या

Covishield vaccine price : राज्यांसाठी कोविशिल्ड लसीच्या दरात कपात, पुनावालांची घोषणा, नवा दर किती?

केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलून चालणार नाही; पंकजा मुंडेंनी सुनावलं

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.