मोदींनी चलता है कल्चर पूर्णपणे संपवलंय का?; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दिल्लीत आज सुशासन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनाचं महत्त्व पटवून दिलं. त्यासोबतच मोदींनी चलता है कार्यक्रम संपवलाय का यावर आपलं मत मांडलं.

मोदींनी चलता है कल्चर पूर्णपणे संपवलंय का?; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 8:43 PM

नवी दिल्ली | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असून राजमधानीमध्ये सुशासन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनाचं महत्त्व पटवून दिलं. “हे सेलिब्रेशन यासाठी आहे की, देशात आज सुशासन पर्व सुरु आहे. या सुशासन पर्वला एका महोत्सवाच्या रुपाच जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. यावेळी फडणवीस यांनी चलता है कल्चर पूर्णपणे संपवलंय यावर आपली प्रतिक्रिया दिलीये.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आम्ही पायाभूत सुविधांचं काम केलं. अटल सेतूची संकल्पना 1972 ची होती. पण त्यावर फक्त चर्चा होत होती. काम झालं नव्हतं. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला की, मुंबई कुठे मागे पडत आहे? हैदराबाद, बंगळुरू मोठा होत आहे तर मुंबई का नाही? तेव्हा मुंबईत जागा अपुरी पडत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे अटल सेतू तयार केला तर जमीन निर्माण होईल हे लक्षात आलं. त्यानंतर आम्ही काम सुरू केलं. आम्हाला फक्त दोन वर्षातच सर्व परवानग्या मिळाल्या. ते केवळ मोदी सरकारमुळेच शक्य झालं. आम्ही पर्यावरणाचं काम करून पूल तयार केला. कोव्हिडचं एक वर्ष सोडलं तर आम्ही पाच वर्षातच हा २३ किलोमीटरचा पूल तयार केला. मोदींच्याच हस्ते शिलान्यास झाला आणि मोदींच्याच हस्ते उद्घाटन केलं. आम्ही अत्यंत कमी वेळात हे केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चलता है चं कल्चर मोठ्या प्रमाणावर मोदींनी कमी केलं आहे. संपूर्णपणे कमी झालं असं मी म्हणणार नाही. पण केंद्रात चलता हैचं कल्चर संपलं आहे. पण राज्यात काही प्रमाणात आहे. पण ते हळूहळू कमी होत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सुशासन या पेक्षा वेगळं काही नसतं. आमच्याकडे फक्त प्लान तयार केले जात होते. चर्चा होत होती. पण काम होत नव्हतं. आम्हाला फक्त पेपरमधून चित्र दाखवलं जायचं. पण काम होत नव्हतं. आम्ही त्यातील अडचणी समजून घेतल्या. मोदी एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेतात. त्याला प्रगती असं म्हणतात. नवी मुंबईतील एअरपोर्ट करायचं होतं. आठ विभागातून आम्हाला परवागनग्या हव्या होत्या. १५ वर्षापासून मिळत नव्हत्या. मी प्रगतीत हे मांडलं. मला दुसऱ्या मिटिंगपर्यंत सात परवानग्या मिळाल्या. आठवीही दोन महिन्यात मिळाली. आम्ही मिटिंगचं हेच मॉडेल महाराष्ट्रात वापरलं. आम्ही वॉर रूम तयार केले. जेवढे स्टेकहोल्डर्स असतील त्या सर्वांना मी बोलवायचो आणि त्यांना अडचण विचाराचयो आणि त्यांच्याकडून सर्व परवानग्या घ्यायचो, असं फडणवीस यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.