Breaking : दिल्लीत सीमापुरी भागात संशयास्पद बॅग सापडल्यानं खळबळ, स्पेशल सेल आणि NSG कडून तपास सुरु
राजधानी दिल्लीच्या (Delhi) सीमापुरी परिसरात एक संशयास्पद बॅग (Suspicious Bag) आढळून आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगमध्ये स्फोटकं असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर तिथे NSG कमांडो दाखल झाले आहे. संशयास्पद बॅग ही ओल्ड सीमापुरी परिसरात एका घरात आढळून आली आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या (Delhi) सीमापुरी परिसरात एक संशयास्पद बॅग (Suspicious Bag) आढळून आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगमध्ये स्फोटकं असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर तिथे NSG कमांडो दाखल झाले आहे. संशयास्पद बॅग ही ओल्ड सीमापुरी परिसरात एका घरात आढळून आली आहे. या बॅगची माहितीत तातडीने NSG ला देण्यात आली. या बॅगमध्ये स्फोटकं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बॅगची तपासणी केली असता त्यात सीलबंद संशयास्पद सामान मिळालं आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे. ही संशयास्पद बॅग आढळून आल्यामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. परिसरातील घरं रिकामी करण्यात आली आहेत.
#UPDATE IED found in the suspected bag from the house in Old Seemapuri area in Delhi. Bomb disposal squad reached the spot pic.twitter.com/mACrVM8Xa8
— ANI (@ANI) February 17, 2022
मिळालेल्या माहितीनुसार स्पेशल सेलच्या (Special Cell) अधिकाऱ्यांच्या मते संशयास्पद बॅग ही जुन्या सीमापुरी भागातील सोनार गल्लीतील एका घरात मिळाली आहे. आता त्या बॅगेची तपासणी केली जात आहे. अद्याप या बॅगमध्ये काय आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. बॅगचा संपूर्ण तपास केल्यानंतरच त्याबाबत माहिती मिळू शकेल असं घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी सांगितलं. ज्या घरात आणि ज्या खोलीत ही संशयास्पद बॅग मिळाली आहे त्या खोलीत काही मुलं भाड्यानं राहत होते आणि ते मुलं आता फरार असल्याची माहिती मिळत आहे.
संशयास्पद बॅगमध्ये विस्फोटक असल्याचा संशय
संशयास्पद बॅगची सूचना मिळाल्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात नाकाबंदी केली. NSG आणि स्पेशल सेलकडून बॅगची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी त्या बॅगमध्ये आयईडी आढळून आलं. स्पेशल सेलची टीम घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित घर बंद असल्याचं त्यांना आढळून आलं. घरात तपासणी केल्यानंतर त्यांना संशयास्पद बॅग मिळून आली. त्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि एनएसजीला पाचारण करण्यात आली, अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इतर बातम्या :