कॅब ड्रायव्हरचा संस्कृतमधील संवाद पाहून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित, व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ…
स्तोत्र आणि मंत्र यापुरतीच शिल्लक राहिलेली संस्कृत भाषा एका कॅब ड्रायव्हरला अस्खलितपणे बोलता येत असल्याने नेटकरी देखील आवक होत असून या भाषेचा प्रसार व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.
दिल्ली : विविधतेने नटलेला देश म्हणून भारताची जगभरात ओळख आहे. त्यामध्ये प्रांत बदलला की खाद्य संस्कृती बदलते, पेहराव बदलतो तशी भाषा देखील बदलते. मात्र, या काळात संस्कृत भाषा ही काही मर्यादित व्यक्तींनाच अवगत आहे. फारसा तिचा वापर होत नसल्याने ती शिकावी यासाठी ती शिकावी म्हणून कोणी प्रयत्न देखील करीत नसावे. पण नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली येथील एक कॅब ड्रायव्हरचा तो व्हिडिओ आहे. कॅब ड्रायव्हर अस्खलित संस्कृत बोलत असल्याने नेटकरी देखील आवक झाले असून आश्चर्य व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर कॅब ड्रायव्हरचं जोरदार कौतुक होत असून नेटकऱ्यांनी चांगलाच डोक्यावर घेतलं आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषा वगळता प्रत्येक राज्यात तेथील एक वेगळी भाषा आहे.
संस्कृत भाषा पूर्वी बोलली जायची पण आता संस्कृत बोलणारे आणि वाचणारे क्वचितच लोक आढळून येत आहे. त्यामध्ये ग्रंथ संपदा वाचन करणारी मंडळी आणि पुरोहित व्यक्तीच संस्कृत जाणून आहे.
असाच एक व्हिडिओ समोर आल्याने एक कॅब ड्रायव्हर अस्खलित संस्कृत बोलत असल्याचे समोर आले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकरी त्याचे कौतुक करत आहे.
संस्कृत बोलणाऱ्या ह्या कॅब ड्रायव्हरचे नाव अशोक असून तो उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील राहणारा आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली येथील असून इंडिया गेटच्या परिसरातील आहे.
Amazing !! This car driver in Delhi speaks Sanskrit with me this morning!! pic.twitter.com/z6XU8B9glk
— LAKSHMI NARAYANA B.S (BHUVANAKOTE) (@chidsamskritam) November 10, 2022
दरम्यान, अशोक हा उत्तरप्रदेशातील गोंडा येथील असून संपूर्ण कुटुंब मूळ गावीच राहत आहे, खरंतर भारतात विविध प्रकारची संस्कृती असल्याने परदेशी पर्यटकांना भारताचे नेहमीच आकर्षण राहिले आहे.
स्तोत्र आणि मंत्र यापुरतीच शिल्लक राहिलेली संस्कृत भाषा एका कॅब ड्रायव्हरला अस्खलितपणे बोलता येत असल्याने नेटकरी देखील आवक होत असून या भाषेचा प्रसार व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.