दिल्लीतील टॅक्सी चालक फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम का ठेवतात?
राजधानी दिल्लीतील अंधश्रद्धाळू टॅक्सी चालक (Delhi Cab Drivers Condom) आपल्या गाडीतील फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम (Delhi Cab Drivers Condom) ठेवतात. बऱ्याचजणांना याचे कारण माहित नाही.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अंधश्रद्धाळू टॅक्सी चालक (Delhi Cab Drivers Condom) आपल्या गाडीतील फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम (Delhi Cab Drivers Condom) ठेवतात. बऱ्याचजणांना याचे कारण माहित नाही. पण जर कंडोम गाडीत नसेल, तर पोलीस दंड आकारतात. याचा अर्थ तुमच्याकडे सर्व कागदपत्र असो, सीटबेल्ट लावलेला असो या सर्व गोष्टींशिवाय तुमच्याकडे कंडोम नसेल, तर पोलीस तुमच्यावर दंड आकारु शकतात, असा त्यांचा समज आहे.
दिल्लीतील अंधश्रद्धाळूंच्या टॅक्सींमध्ये कमीत कमी तीन कंडोम ठेवणे अनिवार्य आहे. प्रवाशाला कुठे जखम झाल्यास कंडोमचा वापर केला जातो. तसेच रक्तस्त्राव होत असलेल्या ठिकाणी कंडोम वापरु शकता. यासाठी फर्स्ट एड बॉक्समध्ये पॅरासिटामॉल, बॅण्डएड, डेटॉल याशिवाय कंडोम ठेवणे गरजेचे आहे, असं दिल्लीतील सर्वोदय चालक संघटनेचे अध्यक्ष कमलजीत गील यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दरम्यान, ड्रायव्हर यांना या मागचे कारणही माहित नाही.
विशेष म्हणजे, दिल्ली वाहन नियम कायदा (1993) नुसार प्रत्येक टॅक्सी चालकाने आपल्या गाडीत फर्स्ट एड बॉक्स ठेवणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये बॅण्डएड, कापूस, आयोडीन, निर्जंतूकीकरण करणारे डेटॉलसारखे औषध आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी असाव्यात. वाहतुकीच्या या नियमात कुठेही कंडोमचा उल्लेख केलेला नाही. तसेच केंद्र सरकारच्याही वाहतूक नियमात असा उल्लेख कुठेच आढळून येत नाही.
दरम्यान, केंद्र सरकाने लागू केलेल्या नव्या वाहतूक नियमांमुळे दररोज दिल्लीत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत आहे. तसेच वाहतूक नियमातील दंड दुपटीने वाढल्यामुळे नागरिकांना मोठ दंड भरावा लागत आहे. या नव्या कायद्यात गाडीत कुठेही कंडोम ठेवण्याची तरतूद नाही.