नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwa) यांनी गुरुवारी दिल्ली महानगरपालिका हद्दीतील गाझीपूर लँडफिल साइटला भेट दिली. त्यावेळी त्यांनी येथील एमसीडीवर (MCD) कब्जा करणाऱ्या भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. अरविंद केजरीवालांनी भाजपवर टीका करताना म्हणाले गेल्या पंधरा वर्षात भाजपने दिल्लीला फक्त कचऱ्याचे ढिग दिले आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका करताना त्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांचीही खिल्ली उडवली.
त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, एक दिवस संबित पात्रा असेही म्हणतील की बीजेपी गंदी पार्टी है आणि आप चांगला पक्ष आहे.
अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला त्यांनी जादूगार म्हटले आहे. ते म्हणतात की, एक दिवस असा येईल की, भाजपचे सगळे लोक आपमध्ये येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गाझीपूर लँडफिल साइटवर भेट दिली त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. भाजपच्या कारकीर्दीवर टीका करताना ते म्हणाले, ‘मी जादूगार आहे आणि मला मने जिंकायची आहेत. लोकांसाठी भरपूर काम करायचे आहे.
भाजपसारखे काळे झेंडे घेऊन उभे राहणार नाही म्हणत आम्ही गुणवत्ता कमावतो, आणि त्याच्या जोरावरच आम्ही राजकारण करतो असंही ते म्हणाले.
ज्या प्रमाणे काँग्रेस शून्य झाले आहे, त्या प्रमाणेच एक दिवस भाजपही शून्य होईल अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले अमित शहा माझ्यावर टीका करतात.
एमसीडीला निधी दिला नाही असा आरोप करतात मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीला किती निधी दिला तेही त्यांनी सांगावे असा प्रतिसवाल त्यांनी केल्यामुळे दिल्लीचे राजकारण ढवळून निघाले आहे.