Arvind Kejriwal : अटकेनंतर लॉकअपमध्ये घालवली रात्र, केजरीवाल यांना आज कोर्टात हजर करणार

Arvind Kejriwal Arrest : दिल्ली दारू घोटाळ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई झाली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली. गुरूवारी रात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. रात्रभर तुरूंगां घालवेल्या केजरीवल यांना सुप्रीम कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

Arvind Kejriwal : अटकेनंतर लॉकअपमध्ये घालवली रात्र, केजरीवाल यांना आज कोर्टात हजर करणार
अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 1:33 PM

दिल्ली दारू घोटाळ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली. गुरूवारी रात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. ईडीची टीम गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास 10वा समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री 9च्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप करण्यात आले. अटकेच्या कारवाईनंतर गुरूवारची रात्र केजरीवाल यांनी तुरूंगातच घालवली. आज त्यांना आज स्पेशल पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तसेच आपच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

याआधी अरविंद केजरीवाल ईडीकडून नऊ वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी हायकोर्टातअर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतरच गुरूवारी ईडीने त्यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. दरम्यान आम आदमी पक्षाने केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. केजरीवाल यांची अटक चुकीची असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर ‘आप’च्या याचिकेवर आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. रस्त्यावरून न्यायालयापर्यंत ही लढाई लढू अशी घोषणा आम आदमी पक्षाने केली आहे.

देशभरात AAPचे प्रदर्शन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या कारवाईनंतर आम आदमी पार्टी आज देशभरात निदर्शने करणार आहे. ‘आप’चे कार्यकर्ते सकाळी 10 वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयाला घेराव घालणार आहेत. केजरीवाल यांच्याविरुद्ध कट रचण्यात आल्याचा आरोपही पक्षातर्फे करण्यात आला आहे. कटाचा आरोप केला.

पुरावे नसतानाही केजरीवाल यांना अटक झाली – सौरभ भारद्वाज

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दावा केला आहे की केजरीवाल यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसतानाही त्यांना अटक करण्यात आली. मात्र हा सत्याचा विजय आहे, असा दावा भाजपने केला आहे. केजरीवाल झुकणार नाहीत, असा विश्वास आप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान आप नेते राघव चढ्ढा यांनीही केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांना अटक करणे हा मोठा कट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कोट्यवधी लोकांचा आशिर्वाद केजरीवाल यांच्यासोबत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी यांची केजरीवाल कुटुंबीयांशी फोनवरून चर्चा

केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोनवरून केजरीवाल कुटुंबीयांशी चर्चा केल्याचे समजते. केजरीवाल यांच्या पत्नीशी राहुल गांधी यांनी फोनवरून संवाद साधला. काँग्रेस पक्ष हा केजरीवाल यांच्या पाठिशी ठामपणे उभा असेल असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले. दरम्यान, आज राहुल गांधी हे केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.