मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त संजय पांडेना दिलासा नाहीच; दिल्ली न्यायालयाकडून 9 दिवसांची ईडी कोठडी
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना 9 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीकडून संजय पांडे यांना अवैध फोन टॅपिंग आणि स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांची हेरगिरी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
मुंबईः नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) लोकेशन घोटाळ्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून (Delhi Court) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey)यांना 9 दिवसांच्या ईडी कोठडी देण्यात आली आहे. कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचार्यांची हेरगिरी केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. याशिवाय माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आणखी एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. संजय पांडे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून 19 जुलै रोजी चौकशी केली. या चौकशीनंतर संजय पांडे यांना अटक करण्यात आली.
100 कोटींच्या वसुलीचा आरोप
याआधी संजय पांडे यांची सोमवारी आणि मंगळवारी सीबीआयकडून चौकशी केली होती. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर सीबीआयकडून संजय पांडे यांची चौकशी करण्यात आली होती, तर एनएसई कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणीही त्यांची चौकशी केली गेली.
राजीनामा दिला, पण स्वीकारला नाही
संजय पांडे यांनी 2001 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांनी आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. काही काळानंतर ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले आणि आपल्या कंपनीच्या संचालक पदावर त्यांनी आपल्या मुलाला बसवले. संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या कंपनीला 2010 ते 2015 याकाळात एनएसईच्या सर्व्हर आणि सिस्टम सुरक्षेशी संबंधित करार देण्यात आला होता. याच प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. पीएमएलए या कायद्यांतर्गत त्यांची चौकशी सुरू आहे.
सीबीआय आणि ईडीकडून एकत्रित कारवाई
संजय पांडे आणि परमबीर सिंग यांची 100 कोटींच्या वसुली प्रकरणात सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग हेही मुंबईचे माजी पोलीस आयुक्तही होते. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांचा वापर करून मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून 100 कोटी रुपयांची वसूली केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तर एका तपासात संजय पांडे यांनी हलगर्जीपणा दाखवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला आहे.
संजय पांडे 30 जून रोजी झाले होते निवृत्त
मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी संजय पांडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक होते. त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे डीजीपीचा सरकारने त्यांना महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र आपीएस रजनीश सेठ यांना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पद मिळाल्यानंतरही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्यानंतर ते मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे संजय पांडे हे मुंबईचे 76 वे पोलिस आयुक्त होते. त्यांनी हा पदभार आयपीएस हेमंत नागराळे यांच्याकडून घेतला होता, व 30 जून रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आज 19 जुलै रोजी त्यांना अटक करण्यात आली.