Manish Sisodia: सिसोदियांना भाजपची मुख्यमंत्री पदाची ऑफर; ‘आप’ फोडून आमच्याकडे या; सीबीआय, ईडीचे सर्व खटले बंद करु

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपकडून त्यांना मोठी ऑफर आली असून दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी असा दावा केला आहे की, भाजपने आम आदमी पार्टीला फोडून त्यांनी भाजपमध्ये यावे आणि सीबीआय, ईडीची सर्व प्रकरणं बंद करुन घ्यावी अशी भाजपची आपल्याला ऑफर असल्याचेही त्यांनी सांगितले.

Manish Sisodia: सिसोदियांना भाजपची मुख्यमंत्री पदाची ऑफर; 'आप' फोडून आमच्याकडे या; सीबीआय, ईडीचे सर्व खटले बंद करु
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 4:52 PM

नवी दिल्लीः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia)  यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांना भाजपकडून ऑफर आली आहे. दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी (Delhi Deputy Chief Minister) असा दावा केला आहे की, भाजपकडून त्यांना आम आदमी पार्टीला फोडा आणि पक्ष विसर्जित करा आणि त्यांच्या मागे लागलेला सीबीआय आणि ईडीचा ससेमिरा बंद करुन घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. एवढेच नाही तर आपल्याला मुख्यमंत्री (CM Offer) पदाचीही ऑफर असल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्यावर कारवाई करत असताना भाजपला अरविंद केजरीवालांना राजकारणातून संपवण्यासाठीच हा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगत, भाजपला जे काय करायचे आहे ते करावं असा सज्जड दमही त्यांनी भाजपला भरला आहे. मनीष सिसोदिया यांच्या या आरोपामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

मनीष सिसोदिया यांनी याबाबत ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, मला भाजपकडून निरोप आला असून आप पक्षाला फोडून आपण भाजपमध्ये या आणि सीबीआय, ईडीचे सर्व खटले बंद करुन घ्या. यावर त्यांनी उत्तर भाजपला माझे उत्तर दिले आहे की, महाराणा प्रतापांचा वंशज असून मी राजपूत आहे. मी माझे डोके कापून टाकेन पण मी भ्रष्ट-कारस्थानांपुढे झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत, तुम्हाला जे करायचे ते करा असा सज्जड दमच त्यांनी भाजपला दिला आहे.

सिसोदिया गुजरात दौऱ्यावर

मनीष सिसोदिया यांनी गुजरात दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच हा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सिसोदिया यांनी यापूर्वी ट्विट केले होते. आणि त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, मी आणि अरविंद केजरीवाल आम्ही दोघं गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहोत. गुजरातच्या जनतेला केजरीवाल यांना संधी द्यायची आहे. 27 वर्षे गुजरातमध्ये शिक्षण, आरोग्य महागाईसाठी भाजप काहीही करू शकली नाही, त्यामुळे आता आम्ही हे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सिसोदियांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर

मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या दाव्यावरून आम आदमी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. यावेळी सिसोदिया यांनी त्यांना सांगितले की, माझे स्वप्न मुख्यमंत्री बनण्याचे नाही, तर प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देण्याचे आहे.

विरोधी पक्षाने सरकारला प्रश्न विचारू नये

सिसोदिया यांनी भाजपवर आरोप करताना सांगितले की, सर्वातआधी भाजप नेते पत्रकार परिषद घेऊन सीबीआय आणि ईडीला धमकावतात आणि त्यानंतर सीबीआयकडून कारवाई केली जाते. देशात महागाई प्रचंड वाढली असून, त्याच्याविषयी कोणत्याही विरोधी पक्षाने सरकारला प्रश्न विचारू नये अशी केंद्र सरकारची भावना आहे. यामुळे मोदीजींच्या मित्रांना दिलासा मिळतो आणि तिच भावना भाजपची असल्याचेही त्यांनी सांगितले.

सिसोदिया यांच्या विरोधात परिपत्रक नोटीस

खरे तर दारू घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. सीबीआयने सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरोधात लुकआउट परिपत्रक जाहीर केले होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या विरोधात ज्या वेळी पत्रक काढण्यात आले त्यावेळी त्याच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपने हे काय नाटक लावले आहे, मी दिल्लीत बिनधास्त फिरतो आहे, त्यामुळे तुम्ही सांगा मी कुठे येऊ तिथे येतो असंही त्यांनी भाजपला सुनावलं आहे.

मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल

सिसोदिया यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींचे एक विधानही शेअर केले आहे, ज्यामध्ये ते सीबीआयच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यानंतर सीबीआयने यासंबंधीची कागदपत्रेही ईडीकडे सोपवली आहेत. त्यानंतर ईडीने सिसोदिया यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला.

कोणताही दारू घोटाळा झाला नाही

मद्य धोरणावर मनीष सिसोदिया यांनी यापूर्वीच म्हटले आहे की, कोणताही घोटाळा झाला नाही, या सगळ्या अफवा आहेत. सीबीआयच्या चौकशीची गरज नाही, यासोबतच अटकेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हा घोटाळा नाही, त्यामुळे अटक करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या घोटाळ्याची त्यांना काळजी असती तर गुजरातमधील सापडलेला अवैध दारूच्या साठ्याची चौकशीही झाली असती असं सांगत ते म्हणाले की, भाजपला अरविंद केजरीवालांना राजकारणातून बाद करण्यासाठी हा त्यांचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.