Tractor March: डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू

डीडीयू रस्त्यावर सुरु असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधील एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. यात ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालक आंदोलकाचा मृत्यू झालाय

Tractor March: डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 4:36 PM

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला. मात्र, एका ठिकाणी हा ट्रॅक्टर मार्च हिंसक झाला. दिल्ली सीमेवरील आयटीओ येथे हे आंदोलन हिंसक झालं. या ठिकाणच्या काही आंदोलकांनी मोर्चाचा मार्ग बदलत थेट लाल किल्ल्यावर चढाई केली. दरम्यान डीडीयू रस्त्यावर सुरु असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधील एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. यात ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालक आंदोलकाचा मृत्यू झालाय (Delhi Farmer tractor march DDU marg tractor accident driver died).

डीडीयू रोडवर पोलिसांकडून ठिकठिकाणी रस्ते अडवण्यात आलेत. त्यातच ट्रॅक्टरचा अपघात होऊन एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. या ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांविरोधात घोषणा देत गोंधळही घातला. शेतकरी आंदोलकांनी आक्रमक रुप धारण केल्याने दिल्लीतील वातावरण चांगलंच तापलंय.

दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना मोजक्या ठिकाणी विशिष्ठ मार्गानेच ट्रॅक्टर मार्च काढण्यास परवानगी दिली होती. मात्र, काही ठिकाणी हे पाळलं न गेल्याने पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापटही झालीय.

दिल्लीतील आयटीओ येथील पूरे चौकात शेकडो शेतकरी आंदोलक उभे आहेत. डीटीसीच्या एका बसचंही येथे नुकसान झालंय. या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांना लाल किल्ल्यावर जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. दरम्यान, पोलीस आणि आंदोलकांच्या या झटापटीत आंदोलकांसोबतच पोलीस कर्मचारीही जखमी झालेत.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते योगेंद्र यादव यांनी शेतकऱ्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलंय. तसेच शांतता हीच शेतकरी आंदोलनाची ताकद असल्याची आठवण करुन दिलीय. हिंसक आंदोलन शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नुकसान करेल, असंही योगेंद्र यादव यांनी नमूद केलंय.

हेही वाचा :

Delhi Farmers Tractor Rally LIVE | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत

Farmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात

मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश

व्हिडीओ पाहा :

Delhi Farmer tractor march DDU marg tractor accident driver died

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.