Delhi Tractor Rally | दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं?

दिप सिद्धू गेल्या नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय होते.

Delhi Tractor Rally | दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं?
दीप सिद्धू
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 7:40 AM

नवी दिल्ली : पंजाबी अभिनेता दिप सिद्धू यांनी (Who Is Deep Sidhu) मंगळवारी ट्र्र्रॅक्टर रॅली (Tractor Rally) दरम्यान लाल किल्ल्यावर निशान साहिब आणि शेतकरी-मजूर एकतेचे दोन झेंडे फडकवल्याचं फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओमध्ये कबुल केलं. पण, दिल्लीत आलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी भडकवलं नाही, असंही ते म्हणाले. लाल किल्ल्यावर तिरंग्याचा कुणीही अपमान नाही केला, असंही त्यांनी स्पष्ट केलं (Who Is Deep Sidhu ).

दिप सिद्धू फेसबुक व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाले?

त्यांच्यावर जे आरोप लावण्यात येत आहेत की लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेसाठी ते एकटे जबाबदार आहेत आणि त्यांनीच काही शेतकऱ्यांना भडकवण्याचं आणि आंदोलनाला हिंसक वळण देण्याचं कामन केलं, हे चुकीचं आहे. “अनेक शेतकरी संघटनांनी आधीच हे स्पष्ट केलं होतं की ते दिल्ली पोलिसांनी सांगितलेल्या रस्त्याने जाणार नाही तर रिंग रोडवरुन लाल किल्ल्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. अशात उगाच हा आरोप करण्यात येत आहे की दिप सिद्धूने या आंदोलनाला बदनाम करण्याचं शड्यंत्र रचलं”.

दिप सिद्धू गेल्या नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय होते. “आंदोलनामुळे लोकांचा रोष वाढला आणि आंदोलकांना भडकवण्यासाठी कुठल्या एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आमचे शेतकरी प्रदर्शन करत आहेत आणि आज जे झालं ते त्याला वेगळ्या पद्धतीने पाहिलं जाऊ शकत नाही.”

“आंदोलक हे कुठल्या व्यक्ती किंवा सरकारी संपत्तीचं नुकसान करण्यासाठी दिल्लीला गेले नव्हते. आम्ही कुठलं शस्त्रही बाळगलं नव्हते. आम्ही फक्त आमचे झेंडे उचलले आणि ट्रॅक्टरवर दिल्लीला पोहोचलो. लोकांनी निदर्शकांना जातीयवादी किंवा अतिरेकी म्हणू नये. लाल किल्ल्यावर तिरंग्याला हटवण्यात आलेलं नाही. आम्ही फक्त शेतकरी-मजूर एकता आणि निशान साहिबचा झेंडा फडकवला.”

कोण आहेत दिप सिद्धू

1984 मध्ये पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात दिप सिद्धू यांचा जन्म झाला. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. किंगफिशर मॉडल हंट पुरस्कार जिंकण्यापूर्वी ते बारचे सदस्य होते. 2015 मध्ये दिप सिद्धू यांचा पहिला पंजाबी सिनेमा- रमता जोगी प्रदर्शित झाला. 2018 मधील सिनेमा ‘जोरा दास नम्ब्रिया’मुळे त्यांची लोकप्रियता वाढली. या सिनेमात त्यांनी गँगस्टरची भूमिका साकारली होती.

Deep Sidhu, Farmers Protest

दिप सिद्धू फेसबुक व्हिडीओ

दीप सिद्धू सरकारी एजंट – गुरनाम सिंग चढुनी

हरयाणामध्ये भारतीय शेतकरी युनियनचे नेता गुरनाम सिंह चढूनी (Gurnam Singh Chadhuni) यांनी एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी दिप सिद्धूवर (Deep Sidhu) शेतकरी आंदोलनाला (Farmers Movement) बदनाम करण्याचं शड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे. दिप सिद्धू आधीपासूनच आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्नात होता, असं ते म्हणाले.

आंदोलनातील नेत्यांना यावर आपत्ती दर्शवली होती आणि लाल किल्ल्यावर जाण्याचा (Red Fort) संयुक्त शेतकरी मोर्चाचा (Sanyukt Kisan Morcha) कुठलाही नियोजित कार्यक्रम नव्हता, पण दिप सिद्धूने असं करत आंदोलनाला खराब करण्याचं काम केलं आहे. गुरनाम सिंग चढुनी यांनी दिप सिद्धूला सरकार एजंट म्हटलं आहे.

दिल्ली हिंसाचारात 83 पोलीस जखमी

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आणि राजधानी दिल्ली हादरुन निघाली. काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांचा आकडा 83 असल्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आल्याचंही कळतंय (Who Is Deep Sidhu ).

‘शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर रॅलीसाठी एक मार्ग ठरवून देण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सन्मानित करण्याची व्यवस्थाही पोलिसांनी केली होती. पण शेतकरी आंदोलकांनी हा मार्ग मानला नाही. निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच ते निघाले. अनेक जागांवर त्यांनी हिंसक घटना घडवून आणल्या, त्यात दिल्ली पोलिसांचे अनेक कर्मचारी जखमी झाले आणि सरकारी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे’, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Who Is Deep Sidhu

संबंधित बातम्या :

Fact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का? तथ्य काय?

Delhi Tractor Rally : दिल्ली हिंसाचारात 83 पोलीस जखमी, 45 ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल

Delhi Tractor rally : जवळपास 200 कलाकार आणि मुलं ‘लाल किल्ल्या’जवळून रेस्क्यू!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.