दिल्लीत भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू, 30 झोपड्या जळून खाक

राजधानी दिल्लीतील शुक्रवारी रात्री भीषण आग लागल्याचं समोर आलं. उशिरा गोकुळपुरी परिसरात झोपडपट्टीला आग लागली. आगीत होरपळल्याने सात जणांचा जळून मृत्यू झाला.

दिल्लीत भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू, 30 झोपड्या जळून खाक
दिल्लीतील गोकुळपुरीत झोपडपट्ट्यांमध्ये आगImage Credit source: एएनआय
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 9:35 AM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील गोकुळपुरी (Gokulpuri Delhi) परिसरात एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी रात्री उशिराच्या सुमारास येथील झोपडपट्टीला आग (Slum Fire) लागली. आगीत होरपळल्याने 7 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. आग लागताच या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अनेक तासांच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मात्र आगीत 30 झोपड्या जळून खाक झाल्या असून सात जणांचा मृत्यू झाला. या आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

राजधानी दिल्लीतील शुक्रवारी रात्री भीषण आग लागल्याचं समोर आलं. उशिरा गोकुळपुरी परिसरात झोपडपट्टीला आग लागली. आगीत होरपळल्याने सात जणांचा जळून मृत्यू झाला. मात्र ही आग कशी लागली, याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही.

मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अनेक तासांच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आले. यामध्ये सात जणांनी जीव गमावला असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

“आज पहाटे 1 वाजता गोकुळपुरी पीएस परिसरात आग लागल्याची घटना घडली. सर्व बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. आम्ही अग्निशमन विभागाशीही संपर्क साधला. आम्ही पहाटे चार वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणली. यामध्ये 30 झोपड्या जळून खाक झाल्या, तर 7 जणांचा मृत्यू झाला” अशी माहिती ईशान्य दिल्लीच्या अतिरिक्त डीसीपींनी दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. सकाळी ही दु:खद बातमी ऐकायला मिळाली. मी स्वतः तिथे जाऊन पीडित कुटुंबांची  भेट घेईन, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

अरविंद केजरीवाल यांचे ट्वीट

संबंधित बातम्या :

जनावराच्या गोठ्याला भीषण आग; आगीत लाखो रुपयांचे नुकसान, बीडमधील अर्धपिंपरी येथील घटना

बीडमध्ये जुन्या वादातून घर पेटवलं, वृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर, शहरात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा

भंगाराच्या गोदामाला भीषण आग! चांदुरबाजारच्या रहिवासी भागात धुळीचे लोट

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.