Gold smuggling: डोक्याला विग लावून 30 लाखाचं सोनं अबू धाबीहून आणलं; आता सगळं सोनं कस्टमकडे जप्त
आपल्या डोक्याला विग लावून सोने भारतात घेऊन येण्याचा व सोन्यावर असलेला कर चुकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले. सोने जप्त करून ते ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्याच्याकडे याप्रकरणी चौकशी सुरु असून त्याच्याबरोबरच इतरही माहिती घेण्यात येत आहे.
नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) अबू धाबीहून आलेल्या प्रवाशाकडून 30 लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. अबू धाबीहून (Abu Dhabi) आलेल्या या प्रवाशाकडे 500 ग्रॅमपेक्षा जास्त सोने (Gold smuggling) सापडले असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवाशाने विग आणि गुदाशयामध्ये 630.45 ग्रॅम सोने लपवून ठेवले होते. त्या व्यक्तीकडे सापडलेल्या सोन्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार 30.55 लाख रुपये इतकी आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची आता चौकशी सुरु केली गेली आहे. या प्रकरणात तो एकटाच आहे की आणखी कोणी साथीदार त्याच्या सोबत हे कृत्य करत असल्याची चौकशी कस्टमचे अधिकारी करत असून त्या व्यक्तिकडे असणारे सोने ताब्यात घेण्यात आले आहे.
अबू धाबीहून जी व्यक्ती भारतात आली आहे, त्याने आपल्या डोक्याला विग लावून त्यामध्ये सोने लपवून ठेवले होते. परदेशातून भारतात सोने आणत असताना त्यावर एक प्रकारचा विशिष्ट कर लावला जातो. त्यामुळे सोने आणताना आणि तो कर भरावा लागू नये म्हणून अनेक नवनव्या युक्त्या लढवून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असतात.
#WATCH | Delhi: A gold smuggling case booked on a passenger from Abu Dhabi at IGI Airport T3; approx 630.45g of gold worth Rs 30.55 lakhs was concealed inside his wig & rectum. Accused arrested; further probe underway: Customs Commissioner Office
(Source: Delhi Customs) pic.twitter.com/2faJD8f1Vu
— ANI (@ANI) April 20, 2022
कर चुकवण्याचा प्रयत्न
आजही ज्या व्यक्तीकडून सोने ताब्यात घेण्यात आले आहे, त्याने आपल्या डोक्याला विग लावून सोने भारतात घेऊन येण्याचा व सोन्यावर असलेला कर चुकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले. सोने जप्त करून ते ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्याच्याकडे याप्रकरणी चौकशी सुरु असून त्याच्याबरोबरच इतरही माहिती घेण्यात येत आहे.
विगवर खर्च किती
अबू धाबीहून सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती होती. यावेळी विमानतळावर सीमाशुल्क विभागाचे जे अधिकारी तैनात होते त्यांनी सांगितले की, अबुधाबीहून नवी दिल्लीत आलेल्या एका प्रवाशाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 3 वर ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकड चौकशी आणि त्याची तपासणी केल्यानंतर 30.55 लाख रुपये किंमतीचे सोने सापडले आहे. हे सोने सुमारे 630.45 ग्रॅम सोने त्याच्या विग आणि गुदाशयात लपवण्यात आले होते. त्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली असल्याचे सांगितले.
संबंधित बातम्या
Kalyan Crime : चोरांकडे सापडले तब्बल 14 मोबाईल, लोकलच्या गर्दीचा फायदा घेत कशी करायचे चोरी?