अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडी पुन्हा ॲक्शन मोडवर, दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर 19 ऑगस्ट रोजी अबकारी घोटाळ्याबाबत सीबीआयकडून छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीनंतर मनीष सिसोदिया प्रकरणाची फाईल सीबीआयकडूनही ताब्यात घेतली गेली होती. त्या दिवसांपासून या प्रकरणात लवकरच ईडीचीही एंट्री होणार असं सांगण्यात आले होते.

अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडी पुन्हा ॲक्शन मोडवर, दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 4:03 PM

नवी दिल्लीः केंद्राच्या अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीकडून देशभरातील विविध ठिकाणी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या अबकारी खात्याच्या कारवाईनंतर मंगळवारी सकाळपासून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार सांगण्यात आले आहे की, दिल्लीबरोबर (Delhi) हरियाणातील गुरुग्राम, महाराष्ट्रात मुंबई, पंजाबमध्ये तेलंगाना आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यामधून जोरदार शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशातील विविध दिल्लीसह मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेशसह 35 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून आणखी ही मोहीम आता कडक करण्यात आली आहे. दिल्लीतील ईडीच्या कारवाईनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Deputy Chief Miister Manish Sisodiya) यांनी ईडीच्या कारवाईबद्दल बोलताना सांगितले की, आपल्यावर पहिल्यांदा सीबीआयचे छापे टाकले, मात्र त्यावेळी सीबीआयला काहीही मिळाले नाही म्हणून त्यानंतर ईडीचा ससेमिरा त्यांनी मागे लावला. मात्र या दोन्हीही कारवाईत यांना काहीच मिळणार नसल्याचेही सिसोदियांनी सांगितले.

शिक्षण व्यवस्थेबद्दल देशात ज्या प्रकारे एक सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे, आणि त्यासाठी अरविंद केजरीवाल प्रचंड कष्ट घेत आहेत, त्या कामाला खीळ बसवण्यासाठीच सीबीआयचा ससेमिरा लावण्याचे काम केंद्राकडून केले जात आहे.

सीबीआयला शाळेचे नकाशे मिळणार

दिल्लीत ज्या प्रकारे शिक्षणाविषयीचे काम चालू आहे, ते कोणीही थांबवू शकत नाही, आणि जे माझ्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील आहेत, त्यांना माझ्याकडे 4 शाळांच्या नकाशाशिवाय दुसरं माझ्याकडे त्यांना काहीच मिळणार नसल्याचे सांगत ईडी आणि सीबीआयच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे.

ऑगस्टमध्ये 15 जणांविरोधात गुन्हा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर 19 ऑगस्ट रोजी अबकारी घोटाळ्याबाबत सीबीआयकडून छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीनंतर मनीष सिसोदिया प्रकरणाची फाईल सीबीआयकडूनही ताब्यात घेतली गेली होती. त्या दिवसांपासून या प्रकरणात लवकरच ईडीचीही एंट्री होणार असं सांगण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या 15 जणांच्या यादीत मनीष सिसोदिया यांचा पहिला नंबर असल्याचेही त्यांनी सांगितले.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.