नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला किती लोक उपस्थित राहणार? निमंत्रण पत्रिका पाहिली का?
Delhi Narendra Modi Oath Ceremony NDA Government : मै नरेंद्र दामोदरदास मोदी... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला किती लोक उपस्थित राहणार आहेत? या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तुम्ही पाहिली का? कधी होणार आहे हा शपथविधी सोहळा? वाचा सविस्तर.......
2024 ची लोकसभा निवडणूक पार पडली. देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं आहे. उद्या रविवार 9 जूनला संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाला विविध देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 7 हजार जणांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. विविध देशांचे पंतप्रधान आणि देशातील महत्वाच्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. राष्ट्रपती भवन परिसरातही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोण- कोण उपस्थित राहणार?
बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूटान, नेपाळ, मॉरीशयस आणि सेशेल्स या देशांचे प्रमुख या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना, मालदीवचे राष्ट्रपति मोहम्मद मुइज्जू, भूटानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे, मॉरीशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ आणि सेशेल्सचे राष्ट्रपती वेवेल रामखेलावन हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका
‘नो फ्लाईंग’ झोन घोषित
नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. काही निर्बंध राजधानी दिल्लीत लागू करण्यात आले आहेत. दिल्लीला ‘नो फ्लाईंग’ घोषित करण्यात आलं आहे. ड्रोन उडवायला तसंच पॅराग्लायडिंग करायला दिल्लीत सध्या परवानगी नाहीये. 9 जून ते 10 जून या काळात दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवन परिसरात अर्धसैन्यदलाच्या पाच कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत. तर NSG कमांडो. ड्रोन आणि स्नाईपर देखील तैनात आहेत.
भाजपने 400 पारचा नारा दिलेला असताना भाजपसाठी धक्कादायक असा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात एनडीएला 293 जागा मिळाल्या. तर भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजप केवळ 240 जागांवर विजयी झाली. तर विरोधकांची इंडिया आघाडी 234 जागांवर विजयी झाली. काँग्रेस पक्षाला 99 जागांवर विजय मिळवता आला.