Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनातून सावरताच लहान मुलांना नव्या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं काय ?

कोरोनामुक्त झालेल्या लहाण बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) नावाचा आजार होत आहे. (delhi multi system inflammatory syndrome)

कोरोनातून सावरताच लहान मुलांना नव्या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं काय ?
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 4:13 PM

मुंबई : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहाण मुलांना लागण होण्याचे प्रमाण सध्या लक्षणीय आहे. या लहान मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्यव्यवस्था आटोकाट प्रयत्न करत असताना आता आणखी एक नवे संकट समोर आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या लहाण बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) नावाचा आजार होत आहे. तसे लक्षणं असलेले 177 रुग्ण दिल्ली- एनसीआर भागात सापडले आहेत. (Delhi NCR founded 177 children infected with Multi System Inflammatory Syndrome)

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर भागात 6 महीने ते 15 वर्षे वयोगटातील लहान मुलांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) नावाचा आजार होत आहे. दिल्ली- एनसीआर भागात एकूण 177 लहान मुलांना हा आजार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकट्या दिल्ली शहरात 109 रुग्णांची नोंद झालीये. तर राजधानी दिल्लीव्यतिरिक्त गुडगाव आणि फरीदाबाद येथे 68 रुग्ण आढळले आहेत.

सुरुवातीची लक्षणं ताप आणि श्वास घेण्यास त्रास

सध्या मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्ली परिसरात मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) आजाराचे रुग्ण आढळत आहेत. दिल्लीतील गंगा राम रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. धीरेन गुप्ता यांनी याबबत अधिकची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार जी मुलं कोरोनापासून अधिक प्रभावित झालेली आहेत, त्यांना जास्त प्रमाणात या आजाराची लागण झाल्याचे दिसतेय. या रुग्णांमध्ये निमोनिया तसेच अँटिबॉडीशी संबंधित इन्फ्लेमेशन दिसत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) झालेल्या मुलांना अंगात ताप भरतो. तसेच हा आजार हृदय, मेंदू आणि फुप्फुस अशा महत्त्वाच्या भागांवर हल्ला करतो. तसेच लहान मुलांमध्ये तीन ते पाच दिवस ताप, तीव्र पोटदुखी तसेच रक्तदाब कमी होणे अशी लक्षणंसुद्धा या आजारात जाणवतात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2000 रुग्ण

कोरोनातून मुक्त झालेल्या लहान मुलांना MIS-C ची लक्षणं दिसत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची विशेष काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच आपले मुल कोरोनामुक्त झाले असले तरी MIS-C या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाळाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स इंन्टेसिव्ह केअर चॅप्टर ने जारी केलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेत MIS-C आजाराचे दोन हजार रुग्ण आढळले होते.

दरम्यान, लहान बालकांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यावर कोरोना लसीची चाचणी सरु करण्यात आली आहे. पटणा येथील एम्स रुग्णालयात 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सीन लसीची चाचणी करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Corona Cases In India | आनंदाची बातमी! देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट, आजपर्यंतच्या सर्वात निच्चांकी रुग्णसंख्येची नोंद

पंतप्रधान मोदींना कोविड 19 आजपर्यंत समजलाच नाही, त्यामुळे लाखोंचा मृत्यू, आकडेवारीतही खोटारडेपण : राहुल गांधी

(Delhi NCR founded 177 children infected with Multi System Inflammatory Syndrome)

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.