दिल्लीत सीबीआय पुन्हा ॲक्शन मोडवर; मद्य धोरणातील पहिल्या आरोपीला अटक…

मद्य धोरणातील घोटाळ्यामुळे ईडीकडून विजय नायरच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत, त्यामुळे आता मनीष सिसोदियाही चर्चेत आले आहेत.

दिल्लीत सीबीआय पुन्हा ॲक्शन मोडवर; मद्य धोरणातील पहिल्या आरोपीला अटक...
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 9:44 PM

नवी दिल्लीः दिल्लीतील मद्य धोरणांवरुन (new excise policy scame) काही दिवसांपूर्वी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यांच्यावर कारवाई होण्याची चिन्हं असतानाच आता दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने पहिली अटक केली आहे. एंटरटेनमेंट, इव्हेंट मीडिया कंपनीचे माजी सीईओ विजय नायर (Vijay Nair) यांना सीबीआयकडून अटक केली गेली आहे.

मद्य धोरणातील घोटाळ्यामुळे ईडीकडून विजय नायरच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले होते. विजय नायर हा उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी सीबीआयकडून जो गुन्हा नोंद केला गेला आहे, त्यामध्ये विजय नायर हे पाचव्या क्रमांकाचे आरोपी आहेत. ते ओन्ली मच लाउडर या इव्हेंट कंपनी मेसर्स एंटरटेनमेंटचे माजी सीईओ होते.

याच मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून गेल्या महिन्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी या मद्य धोरणाचा घोटाळा झाल्याची जोरदार चर्चा झाली होती.

मद्य धोरणाच्या घोटाळ्यातील मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर मात्र भाजप आणि आम आदमी पक्ष आमनेसामने आले होते.

या पक्षांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले होते. आता या प्रकरणी सीबीआयने एंटरटेन्मेंट या इव्हेंट कंपनी ओन्ली मच लाऊडरचे माजी सीईओ विजय नायर यांनाही अटक केली गेली आहे.

विजय नायर 2014 पासून ‘आप’शी संबंधित होते. पक्षासाठी निधी उभारणीचे कामही ते करत होते. विजय नायर यांच्याकडे ‘आप’ पक्षाची मीडिया आणि संवाद राखण्याची रणनीती आखण्याचे कामही त्यांच्याकडेच होते. त्यामुळे विजय नायर हे आपचे ज्येष्ठ नेते आणि मनीष सिसोदिया यांच्या जवळचे मानले जात होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.