दिल्लीवर कोरोनाचे पुन्हा संकट”;एकाच दिवसातील रुग्णांच्या आकड्यामुळे प्रशासनाची धावपळ

महाराष्ट्रात 105, तेलंगणात 93, कर्नाटकात 57, गुजरातमध्ये 54 आणि दिल्लीत 19 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे, गेल्या एका आठवड्यापासून भारतात कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली

दिल्लीवर कोरोनाचे पुन्हा संकट;एकाच दिवसातील रुग्णांच्या आकड्यामुळे प्रशासनाची धावपळ
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 11:15 PM

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत कोरोनामुळे पु्न्हा एकदा कोरोनामुळे दिल्लीत चिंतेचं वातावरण पसरले आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे आता आरोग्यखाते ही सतर्क झाले आहे. गुरुवारी दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्या 100 च्या पुढे गेली असल्यामुळेच भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्ली सरकारच्या दिल्ली आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 23 मार्च रोजी कोरोनाचे 117 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतील संसर्ग 4.95 टक्क्यांवर पोहचला असला तरी गुरुवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मागील आकडेवारी पाहिल्यास, 22 मार्च रोजी दिल्लीत कोरोनाचे 84 नवीन रुग्ण आढळले होते. तर संसर्ग दर 5.08 टक्के होता. तर 21 मार्च रोजी दिल्लीत कोरोनाचे 83 नवीन रुग्ण आढळले असून त्या्दिवशी 1 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

हा संसर्ग दर 5.83 टक्के होता. गेल्या 24 तासांत दिल्लीत 2362 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी 63 रुग्ण बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत सध्या कोरोनाचे एकूण 346 रुग्ण आहेत, तर त्यापैकी 212 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये असून 17 रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

भारतातील रुग्णांची एकूण संख्या

देशात गेल्या 140 दिवसांमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. गुरुवारी भारतात कोरोनाचे 1,300 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील एकूण रुग्णांची संख्या 46, 99,418 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एका दिवसात कोरोनाच्या नवीन रुग्णांची ही संख्या गेल्या 140 दिवसांतील सर्वाधिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कोरोना वाढण्याचे मुख्य कारण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की ओमिक्रॉन XBB.1.16 यामुळे देशातील संसर्गाचे मुख्य कारण असू शकते, परंतु आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ किंवा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत XBB.1.16 शोधण्यासाठी 344 रुग्णांची नोंद झाली होती.

या राज्यात रुग्णसंख्या वाढली

महाराष्ट्रात 105, तेलंगणात 93, कर्नाटकात 57, गुजरातमध्ये 54 आणि दिल्लीत 19 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे, गेल्या एका आठवड्यापासून भारतात कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये कोविड-19 चे रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.