पूजा खेडकर पुरत्या घेरल्या गेल्या, अटकेची टांगती तलवार, अंतरिम जामीन देण्यास कोर्टाने नकार दिल्याने मोठा धक्का

Delhi Patiala House Court on Ex IAS Pooja Khedkar Case : पूजा खेडकर यांना अंतरिम जामीन देण्यासाठी कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

पूजा खेडकर पुरत्या घेरल्या गेल्या, अटकेची टांगती तलवार, अंतरिम जामीन देण्यास कोर्टाने नकार दिल्याने मोठा धक्का
पूजा खेडकर
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 7:14 PM

वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पूजा खेडकर यांच्या अटकेची टांगती तलवार आहे. अंतरिम जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर यांच्या अंतरिम जामीनाला नकार दिला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने पूजा खेडकर यांच्या FIR दाखल केली होती. त्यानंतर केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे.

कोर्टाकडून नाराजी व्यक्त

यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने पूजा खेडकर यांच्या विरोधात फसवणुकीचा एफआयआर दाखल केला होता. यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. कोर्टाने पूजा खेडकरच्या न्यायलयातील उपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. पूजा खेडकर सुनावणीला गैरहजर राहिल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली. सुनावणीवेळी पूजा खेडकर एकदाही उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे त्या उपस्थित होत्या असं मानलं जाणार नाही, असं कोर्टाने म्हटलं.

पूजा खेडकर यांच्या आईच्या जामीनवर उद्या निकाल

पूजा खेडकर यांच्या आईच्या जामीनाबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आहे. युक्तिवाद पूर्ण मात्र निर्णय कोर्टाने राखून ठेवला आहे. खेडकरच्या जामीन अर्जवर उद्या निकाल येणार आहे. मनोरमा खेडकरकडून पुणे सत्र न्यायालयात करण्यात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. शेतकऱ्यांना धमकवल्या प्रकरणाी मनोरमा खेडकरवर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. याधी मनोरमा खेडकरला दोन वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या मनोरमा खेडकर न्यायालयीन कोठडीत आहे.

अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजा खेडकरांच्या बनावच काददपत्रांवर भाष्य केलं आहे. फक्त पूजा खेडकर नाही तर असे अनेक अधिकारी असण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरच नाही तर बनावट माहितीच्या आधारे अनेक जण यूपीएससीची फसवणूक करत आहेत, असं विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.