पहिल्यांदाच! मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, अभूतपूर्व गोंधळ; नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 02, 2024 | 5:30 PM

PM Narendra Modi Speech in Loksabha : मोदींचं भाषण सुरु होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी लोकसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षही भडकले... संसदेत पहिल्यांदाच नरेंद्र मोदींना भाषण करणंही मुश्कील झालंय. संसदेत नेमकं काय घडतंय?

पहिल्यांदाच! मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, अभूतपूर्व गोंधळ; नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदीचं संसदेत भाषण
Image Credit source: Loksabha TV
Follow us on

एनडीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे.  लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे. यावेळी लोकसभा अध्यक्षही भडकले. सभागृहाची प्रतिष्ठा राखा, असं म्हणत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना सुनावलं. गेल्या 10 वर्षांच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बोलणंही मुश्किल झाल्याचं चित्र देशाने पाहिलं. नरेंद्र मोदी सध्या भाषण करत आहेत. मात्र कानाला हेडफोन लावून त्यांना भाषण करावं लागत आहे.

संसदेचं नेमकं काय घडतंय?

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला संबोधन केलं. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करत आहेत. यावेळी विरोधकांनी नीट परिक्षेतील घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरला. यावेळी एनडीए सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करणंही मुश्कील झालं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांना सुनावलं. मात्र तरिही विरोधांची घोषणाबाजी बंद झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोंधळातच आपलं भाषण करावं लागत आहे.

लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना सुनावलं

लोकसभेत प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. विरोधी पक्षातील खासदार सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षातील खासदारांना सुनावलं आहे. लोकसभा या सभागृहाची एक प्रतिष्ठा आहे. ती राखली गेली पाहिजे. विरोधी पक्षातील नेत्यांना बोलण्यासाठी योग्य वेळ दिला गेला. आता पंतप्रधान बोलत असताना असा गोंधळ घालणं योग्य नाही. संसदेच्या परंपरेला शोभणारं नाही, असं ओम बिर्ला म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे

10 वर्षात आमची सरकार सबका साथ सबका विकास या मंत्रावर काम करत आली आहे. आमच्या सरकारने तुष्टीकरणावर नाही तर संतुष्टीकरणावर काम केले. 10 वर्षात आमचं काम पाहून देशाने आम्हाला 140 कोटी जनतेने आम्हाला संधी दिली आहे. या निवडणुकीत भारतातील जनतेने विवेकतेने मतदान केले. आम्ही विकसित भारतासाठी जनतेचा आशिर्वाद मागितला होता. विकसित देश झाला तर देशातील जनतेचे स्वप्न पूर्ण होतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं आहे.