दोघा भावांनी झटपट श्रीमंत व्हायच स्वप्न पाहिलं अन् सुरू केला बिझनेस; व्यवसाय पाहून पोलीस उडालेच, आरोपींना अटक
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पोलिसांनी दोघा भावानां अटक केली आहे. त्यांचा व्यवसाय पाहून पोलिसांना प्रचंड धक्का बसला आहे.
दिल्लीमधून दररोज नव नवीन प्रकरणं समोर येत असतात.असंच एक प्रकरण दिल्ली पोलिसांसमोर आलं. या प्रकरणामुळे पोलिसांना प्रचंड धक्का बसला आहे. जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोन भावांना अटक केलं आहे.विशेष म्हणजे सख्खे भाऊ असलेल्या या दोन आरोपींना अटक करताना देखील पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.गेल्या चार-पाच दिवसांपासून पोलीस या दोन आरोपींच्या मागावर होते. मात्र काही केल्या ते पोलिसांच्या जाळ्यात अडकत नव्हते. अखेर या आरोपींना अटक केल्यानंतर आता पोलिसांचा जीव भांड्यात पडला आहे.
गेल्या चार -पाच दिवसांपासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. मात्र हे दोन्ही भाऊ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात प्रत्येकवेळी यशस्वी ठरत होते.पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली, त्यांचे पोस्टर चौकाचौकात लावले.दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. त्यातील एकाचं वय 19 वर्ष तर दुसऱ्याचं वय 23 वर्ष आहे.दोघांनी देखील शाळा अर्ध्यातूनच सोडली आहे.
हे दोघेही एकाच किराणा दुकानात कामाला होते. मात्र आपणही झटपट श्रीमंत व्हावं असं या दोघांना वाटलं, त्यानंतर त्यांनी या किराणा दुकानातील नोकरी सोडली आणि एक दुचाकी खरेदी केली. त्यानंतर ते दिल्लीच्या रस्त्यावर लूटपात आणि चैन स्नॅचिंग करू लागले. थोड्याच दिवसांमध्ये त्यांची लाईफ स्टाईल बदलली. ते आरामात जगू लागले. मात्र या परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटना पोलिसांची डोकेदुखी वाढवत होत्या. त्यावर आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र मार्ग मिळत नव्हता.
अशातच एक तरुण धावत धावत पोलीस स्टेशनमध्ये आला, त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली केली दोन दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी माझा मोबाईल हिसकावला, पोलिसांनी तातडीनं त्या गाडीचा पाठलाग करून त्यांना पकडलं.त्यानंतर जो प्रकार उघडकीस आला त्यामुळे पोलिसांचं डोकं देखील सुन्न पडलं. पोलिसांना मोठा धक्का बसला. कारण गेल्या अनेक दिवसांपासून ते ज्या आरोपींच्या मागावर होते, ते आरोपी अखेर त्यांनी पकडले होते.