AltNews: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पत्रकार मोहम्मद झुबेरला अटक; उत्तर प्रदेशातही गुन्हा; माहिती देण्यास पोलिसांचा नकार
ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी सांगितले की, मोहम्मद जुबेरला वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी बोलवून घेऊन त्याला अटक करण्यात आली होती. त्याअगोदर याप्रकरणाची कोणतीही कल्पना त्याला दिली नव्हती असा थेट आरोप त्यांनी दिल्ली पोलिसांवर करण्यात आला आहे.

नवी दिल्लीः धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप ठेवत दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी ऑल्ट न्यूजचे (Alt News) सहसंस्थापक मोहम्मद जुबेरला (Co-Founder Mohammad Juber) अटक करण्यात आली आहे. मोहम्मद जुबेरवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर उत्तर प्रदेशातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) कलम 153A आणि 295A अंतर्गत मोहम्मद जुबेवर गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद जुबरेवर ट्विटरवरून धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Please note. pic.twitter.com/gMmassggbx
— Pratik Sinha (@free_thinker) June 27, 2022
माहिती न देताच अटक
ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी सांगितले की, मोहम्मद जुबेरला वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी बोलवून घेऊन त्याला अटक करण्यात आली होती. त्याअगोदर याप्रकरणाची कोणतीही कल्पना त्याला दिली नव्हती असा थेट आरोप त्यांनी दिल्ली पोलिसांवर करण्यात आला आहे. मोहम्मद जुबेरला अटक केल्याप्रकरणी पोलिसांकडे वारंवार मागणी करूनही एफआयआरची प्रत देण्यात आली नाही असं ट्विट प्रतीक सिन्हा यांनी केले आहे.
धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जुबेरला जुन्या प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मागील एका प्रकरणाबद्दल पोलीस जुबेरला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणार आहेत. जेणेकरून चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची मागणी करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या बाबतीत पुरेसे पुरावे मिळाल्यानंतरच मोहम्मद जुबेरला दिल्लीतून अटक करण्यात आल्याचे पोलिसानी सांगितले. मोहम्मद जुबेर हा प्रतीक सिन्हासोबत एक वेबसाइट चालवतो. धार्मिक मुद्यावरून दंगल घडवण्याच्या हेतून, लोकांना भडकवणे आणि त्याचवेळी एका विशिष्ट गटाच्या धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी, त्या गटाचा अपमान करणे, आणि विशिष्ट गटाच्या धार्मिक भावनांचा अपमान केल्या प्रकरणी 295A हा गुन्हा दाखल केला गेला आहे.
ओवेसी यांनीही अटकेचा केला निषेध
एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही मोहम्मद जुबेरला अटक केल्याप्रकरणी या घटनेचा त्यांनी निषेध नोंदविला आहे. त्यांनी याप्रकरणी म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी मोहम्मद जुबेरला अटक केली आहे ती गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे. त्याला कोणतीही सूचना न देता त्याच्या गुन्हा नोंद गुन्हा नोंद करून त्याला अटक करणे ही चुकीची गोष्ट आहे असंही त्यांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांवर आरोप करताना ओवेसी म्हणाले की, दिल्ली पोलिस मुस्लिमविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीत, तर गुन्हे नोंदवणाऱ्यांवर कारवाई करतात असा आरोप त्यांनी दिल्ली पोलिसांवरही केला आहे.
Arrest of @zoo_bear is highly condemnable. He’s been arrested with no notice & in some unknown FIR. Total violation of due process. @DelhiPolice does nothing about anti-Muslim genocidal slogans but acts swiftly against “crime” of reporting hate speech & countering misinformation
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 27, 2022
ना नफा तत्वावर चालू होते ऑल्ट न्यूज
ना नफा या तत्वावर 2017 मध्ये ऑल्ट न्यूज चालू करण्यात आले होते. जगातील महत्वाच्या प्रमुख माध्यमांपैकी एक आहे. ऑल्ट न्यूजचे संस्थापक आण सहकारी अनेक वर्षांपासून उजव्या विचारसरणीचे जे लोक ऑनलाइन ट्रोलिंग आहेत त्यांच्याकडून आणि पोलिसांच्या ससेमिरा सोसत आहेत. मोहम्मद जुबेर विरुद्ध अलिकडेच उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या वर जे आरोप करण्यात आले होते, त्याप्रकरणीच त्याला दिल्लीत अटक करण्यात आली होती.